Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या प्रतिनिधींचा मॉरिशस मधील सहकारी पतसंस्था चळवळीचा अभ्यास दौरा..

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 5 7 6 8

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या प्रतिनिधींचा मॉरिशस मधील सहकारी पतसंस्था चळवळीचा अभ्यास दौरा..

मॉरिशस हे आफ्रिका खंडातील छोटे बेट असले, तरी मॉरिशस मधील सहकारी पतसंस्थांनी मॉरिशसच्या आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावला आहे.

पुणे : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सहकारी पतसंस्थांचे १०० प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मान.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे नेतृत्वाखाली मॉरिशस येथील पतसंस्थांच्या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी जाणार असल्याची माहिती राज्य फेडरेशनच्या कार्यकारी संचालिका सौ.सुरेखा लवांडे यांनी दिली.
मॉरिशस देशाच्या फेडरेशनचे अध्यक्ष जेम्स विन्सलोकामची यांचे खास निमंत्रणा वरून ही भेट होणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत राज्यातील महिला बचत गटातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व बळकटीकरणासाठी चालविण्यात येत असलेल्या सहकार उद्यमीच्या कामकाजाच्या माहितीचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य फेडरेशनच्या संचालिका व सहकार उद्यमीच्या अध्यक्षा डॉ.अंजलीताई पाटील यांनी दिली.
या दौऱ्याबाबत अधिक माहिती देताना राज्य फेडरेशनचे संचालक व प्रशिक्षण समितीचे सदस्य भास्कर बांगर म्हणाले की, ‘पर्यटनातून प्रशिक्षण’ ही थीम घेऊन हा अभ्यास दौरा आयोजित केला असून मॉरिशस मधील सहकार, पर्यटन, शिक्षण आदींबाबतचा सामंजस्य करारनामा मॉरिशस फेडरेशनचा महाराष्ट्र व कर्नाटक सहकारी पतसंस्था फेडरेशन बरोबर सामंजस्य करारनामा करण्यात येणार आहे.
विशेषतः भारत देशातील सहकारी पतसंस्थांमध्ये असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान मॉरिशसमधील सहकारी पतसंस्थांना पुरविणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात नाशिक येथील नेटवीन सॉफ्टवेअर प्रा.लि.चे व पुणे येथील पिओसिट सॉफ्टवेअर कंपनी यांचे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधीच्या कार्याची माहिती स्थैर्य निधीचे संचालक शिवाजी आप्पा कपाळे व विठ्ठलराव अभंग सादर करणार आहेत.
मॉरिशस येथील लाँग माउंटन को – ऑप. क्रेडिट युनियन (Long mountain CCU) व क्युअरपाईप को – ऑप. क्रेडिट युनियन (Curepipe CCU) या पतसंस्थांना भेटी देण्याबरोबरच मॉरिशस देशातील मॉरिशस को – ऑप. सेव्हींग अँड क्रेडिट लि.चे प्रतिनिधी व मॅफकॉसच्या अभ्यास दौऱ्यातील प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक देखील आयोजित करण्यात येणार आहे.

4/5 - (7 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 7 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे