Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना राज्य फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर यांचे उत्तम मार्गदर्शन – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 6 1 7

पुणे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना राज्य फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर यांचे उत्तम मार्गदर्शन – काका कोयटे, अध्यक्ष

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, नारायणगाव, मंचर, जुन्नर या भागातील सहकारी पतसंस्थांची चळवळ सक्षम आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीला अभिमान वाटावा असे काम, या भागातील पतसंस्थांचे आहे. या परिसरातील सहकारी पतसंस्थांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत असून शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कै.ॲड.भाईसाहेब पुरवंत यांनी देखील या भागातील पतसंस्थांना योग्य दिशा दिली असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित जुन्नर येथील शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आंबेगाव, नारायणगाव, मंचर, जुन्नर परिसरातील १३ पतसंस्थांच्या प्रतिनिधींच्या प्रशिक्षण शिबिरा प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या परिसरातील सहकारी पतसंस्थांची एकजूट खूप चांगली आहे. ठेवीदारांचा विश्वास देखील या भागातील सहकारी पतसंस्थांवर आहे. त्यामुळे लोकसेवा बँकेत या परिसरातील पतसंस्थांची गुंतवणूक अडकून देखील एकाही पतसंस्थेच्या ठेवीदारांनी ठेवी परत मागितल्या नाहीत, ही बाब देखील ठेवीदारांसाठी भूषणावह आहे.

प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा सत्कार शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे सेक्रेटरी ॲड. समीर पुरवंत यांनी केला. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अजित वल्हवणकर उपस्थित होते. या परिसरातील १३ पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ व सेवक वर्ग यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिवशक्ती पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक खत्री यांनी मानले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 6 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे