Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मॉरिशस सहकारी पतसंस्था फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करारनामा संपन्न…

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 8 1 4 1

मॉरिशस सहकारी पतसंस्था फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करारनामा संपन्न…

पुणे : मॉरिशस या देशातील पतसंस्था चळवळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व द मॉरिशस को – ऑप. सेव्हिंग अँड क्रेडिट लिग लि. यांच्यामध्ये १ फेब्रुवारी २०२४ रोजी ऐतिहासिक सामंजस्य करारनामा करण्यात आला. मॉरिशस येथे संपन्न झालेल्या या ऐतिहासिक करारनाम्याप्रसंगी द मॉरिशस को – ऑप.सेव्हिंग अँड क्रेडिट लीग लि.चे प्रेसिडेंट जेम्स विन्स्लो कामाडू, मॉरिशस पतसंस्था फेडरेशन चे संचालक साथीदानंद जिऊथ, स्टीव्ह लपोल, एलन बाट्री, दीपक बेनिडिन, रिचर्ड लव्हरड्युअर, नूतन राजपूत आदी पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र व कर्नाटक सहकारी पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

या करारनाम्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व मॉरिशस पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सहकारी पतसंस्थांना ऑनलाइन ट्रेनिंग देण्यात येणार आहे. तसेच पतसंस्था चालवण्यासाठी आवश्यक असणारे भारतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान ही उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी नेटविन सॉफ्टवेअर प्रा लि. व पिओसिट सॉफ्टवेअर प्रा लि. या कंपन्या सहकार्य करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्योग अंतर्गत त्या देशातील महिलांचे बचत गट स्थापन करून त्या मार्फत विविध उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सहकार उद्यमी अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने मॉरिशसला पाठवून विक्री करण्याचा ही मानस असल्याचे सहकार उद्यमीच्या अध्यक्षा ॲड.अंजली पाटील यांनी सांगितले.

तसेच मॉरिशस मध्ये भारतीय उत्पादनाला प्रचंड मागणी असल्याने या ऐतिहासिक समझोता करारनाम्यानुसार या दोन्ही देशांची देवाण-घेवाण सुरू झाल्यास महिलांचे सक्षमीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकेल असे मत सरस्वती महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सुचित्रा दिवाण व क्रांती शितोळे यांनी व्यक्त केले.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी देखील या दौऱ्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्याशी संपर्क साधून स्वागत केले. तसेच मॉरिशस येथील लाँग माउंटन को – ऑप. क्रेडिट युनियन (Long mountain CCU) व क्युअरपाईप को – ऑप. क्रेडिट युनियन (Curepipe CCU) या पतसंस्थांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेण्यात आली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या ‘पर्यटनातून प्रशिक्षण’ या उपक्रमांतर्गत या अभ्यास दौऱ्यात कर्नाटक सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष संजय होजमट, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे जेष्ठ संचालक चंद्रकांत वंजारी, सहकार उद्यमीच्या अध्यक्षा ॲड.अंजली पाटील, राज्य फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, कार्यकारी संचालिका सौ.सुरेखा लवांडे, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधीचे संचालक शिवाजी आप्पा कपाळे, विठ्ठलराव अभंग आदींसह महाराष्ट्र व कर्नाटक सहकारी पतसंस्था फेडरेशनचे ९० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

1.7/5 - (6 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 1 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे