Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जयवंत पवार यांनी कृष्णाई पतसंस्थेच्या माध्यमातून पुण्ण्याचे काम केले – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 2 4 4

जयवंत पवार यांनी कृष्णाई पतसंस्थेच्या माध्यमातून पुण्ण्याचे काम केले – काका कोयटे, अध्यक्ष

वाई : महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीतील सहकारी पतसंस्था या सर्वसामान्यांच्या आहेत. वाई तालुक्यातील चिंधवली सारख्या ग्रामीण भागातील कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्था जयवंत पवार यांनी बंद असलेली पतसंस्था पुनर्जीवित करून प्रगती पथावर आणली. त्यांचे हे काम पतसंस्था चळवळीसाठी भुषणावह असून त्यांनी पुण्ण्याचे काम केले आहे. पवारांसारखे तळमळीचे कार्यकर्ते पतसंस्था चळवळीत असल्यामुळे महाराष्ट्रातील कोणतीही पतसंस्था अडचणीत येणार नाही. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेला राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संस्थेचे चेअरमन व संचालकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

तसेच दिवंगत इंडियन फॉरेन अधिकारी केनिया , थायलंड या देशात राजदूत व वाई तालुक्यातील भुईंज या गावचे सुपुत्र राजेश स्वामी यांच्या स्मरणार्थ चालविण्यात येत असलेल्या राजेश अभ्यासिका व तिरंगा इंग्लिश मिडियम स्कूलला ही भेट देऊन सविस्तर माहिती घेत, कृष्णाई पतसंस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी तिरंगा इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष व कृष्णाई पतसंस्थेचे संचालक जयवंत आबा पवार यांच्या हस्ते राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी कृष्णाई पतसंस्थेच्या चेअरमन सौ.वनिता जयवंत पवार, व्हा.चेअरमन यशवंत इथापे, संचालक जयवंत पवार, वसंत गोळे, गोपाळ इथापे, योगेंद्र पवार, बाळकृष्ण मोरे, विनायक सूर्यवंशी, अमोल शिंगटे, राजेंद्र गुरव, तुळशीदास कांबळे, संचालिका श्रीमती गणपत निकम, राजेंद्र इथापे, सचिव विशाल निकम आदींसह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

3.7/5 - (7 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 2 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे