Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दूधगंगा पतसंस्था आदिवासी भागातील रोल मॉडेल – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 1 7 7 7

दूधगंगा पतसंस्था आदिवासी भागातील रोल मॉडेल – काका कोयटे, अध्यक्ष

अकोले : आदिवासी भागात आदिवासींच्या विश्वासावर नावलौकिक मिळविलेली पतसंस्था ही आज महाराष्ट्रात नावलौकिक मिळवत आहे. ग्राहक सभासदांना देत असलेल्या सेवेमुळे आर्थिक भरभराट ही या संस्थेची मोठ्या प्रमाणात होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी लोक वस्ती असलेली ही संस्था बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आदिवासी भागातील रोल मॉडेल बनेल. असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

अकोले तालुक्यातील दूधगंगा ग्रामीण बिगर शेती नागरी सहकारी पतसंस्था नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव चासकर प्रास्ताविकात म्हणाले की, ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या दूधगंगा पतसंस्थेने ५० कोटी रुपयांच्या ठेवी जमा करून २८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. बहुतांशी कर्ज वाटप हे आदिवासींना केलेले असून त्याची फेड ही ते प्रामाणिकपणे करत आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनरल मॅनेजर आर.एम.धुमाळ व कासार सर यांनी केले. या वेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, विधान सभा सदस्य किरण लहामटे, अगस्ती सहकारी साखर कारखाने चेअरमन सिताराम गायकर, ए.डी.सी.सी. बँकेचे संचालक मधुकरराव नवले, भाऊ पाटील नवले, शिवाजीराव कपाळे, प्रकाश शेठ लोढा आदींसह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक संस्थापक चेअरमन विठ्ठलराव चासकर,व्हा.चेअरमन दिलीप भांगरे, कार्यकारी संचालक विजयकुमार घेवारे, संचालक चंद्रकांत नाईकवाडी, प्रभाकर कोटकर, बालाजी येलमामे, योगेश देशमुख, अण्णासाहेब शेटे, कमलेश गांधी, संचालिका वैशाली धुमाळ, वैशाली धुमाळ, किरण लोहरे, एकनाथ ढोन्नर साहेबराव नवले, त्रिंबक आवारी, संतोष नाईकवाडी, कचरू सहाने, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संचालक डॉ.नितीन चासकर यांनी मानले.

1.7/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 7 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे