जनमंगल पतसंस्थेचा आर्थिक आलेख उंचावणारा – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
जनमंगल पतसंस्थेचा आर्थिक आलेख उंचावणारा – काका कोयटे, अध्यक्ष
शेवगाव : जनमंगल नागरी सहकारी पतसंस्थेने ३२ वर्षापासून शेवगाव तालुक्यातील सभासदांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. या संस्थेने १८ कोटी ६० लाख रुपयांच्या ठेवी संकलित केल्या असून १२ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.त्या पैकी सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज ९ कोटी ३० लाख रुपये इतके आहे. संस्थेचा आर्थिक आलेख हा उंचावणारा असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या जनमंगल नागरी सहकारी पतसंस्थेस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सदिच्छा भेट दिली असता, संस्थेचे संचालक मंडळ व अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा सत्कार जन मंगल पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.अर्जुनराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी जन मंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन नंदकिशोर लड्डा, संचालक मधुकर देवणे, ॲड.द्वारकानाथ बटुळे, रामदयाळ लाहोटी, रमेश भारदे, ॲड. रघुनाथ राठी, राजू तरटे, सचिन वारकड, संचालिका श्रीमती शकुंतला जाजू, श्रीमती सुनंदा लबडे, जनरल मॅनेजर महादेव साखरे, अधिकारी कर्मचारी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार व्हा.चेअरमन नंदकिशोर लड्डा यांनी मानले.