श्रीराम पतसंस्थेत एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
श्रीराम पतसंस्थेत एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन…
जुन्नर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. प्रशिक्षण वर्गाचे अध्यक्ष काका कोयटे यांचा सत्कार श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इतर व्याख्यात्यांचाही सत्कार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ‘पतसंस्था चळवळीची सद्य: स्थिती’ व राज्य फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर यांनी ‘संभाव्य लेखापरीक्षण गुण निकष’ तर मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी ‘सहकाराची उन्नती : समज – गैरसमज व पतसंस्था : संचालक व कर्मचारी समन्वय’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.
तसेच बँकिंग तज्ञ प्रशांत खोपटीकर यांनी ‘कर्ज व्यवस्थापन व सर्च रिपोर्ट, दस्तऐवज, वसुली’ आणि लेखापरीक्षण विभागाचे सेवानिवृत्त सहनिबंधक तानाजी कवडे यांनी ‘एनपीए व्यवस्थापनाचे प्रकार व कमी करावयाचे मार्ग, पद्धती’ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्रे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, संचालक विजय घोगरे, अनिल थोरात, अनिल डेरे, नवनाथ चौगुले, सुनील श्रिवत, यल्लू लोखंडे, दयानंद डुंबरे, अमित बेनके, ज्ञानेश्वर रासने सह संस्थेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.