Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

यवतमाळ जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ विजयी…

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 4 8 0 2

यवतमाळ जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ विजयी…

राजुदास जाधव व सहकार पॅनलचे विजयी उमेदवार.

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पगारदार व नागरी सहकारी पतसंस्था संघाच्या निवडणुकीत राजुदास जाधव यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने एकतर्फी विजय मिळवला असून शिवसेना जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार, मजूर संघाचे अध्यक्ष विलास महाजन तथा सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष श्याम लोखंडे यांचेसह परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

      यवतमाळ जिल्हा पगारदार व नागरी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव असून मागील २० वर्षापासून प्रत्येक वेळी निवडणुक बिनविरोध होत होती. यावेळी सुद्धा राजुदास जाधव यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले होते. परंतु सहकार भारतीच्यावतीने परिवर्तन पॅनलचे उमेदवार रिंगणात उतरविले होते.

        ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ चे प्रकाश पाटील देवसरकर, ॲड. देविदास काळे, दिगंबर जगताप, लक्ष्मणराव घोटेकर, महादेव गावंडे, निरज डफळे, प्रदीप झाडे, लुकमान अहमद, संजय पडोळे, अशोक जयसिंगपूर, बाळकृष्ण गाढवे, दत्तात्रय मनवर, किरण दरेकर, नंदा आमटे असे १५ उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले.

      जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी २ दिवसांपूर्वी या निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु राजुदास जाधव यांच्या संघटन कौशल्याने त्यांनी एकहाती विजय प्राप्त केला. सर्व उमेदवाराची एकजूट व मतदारांचा विश्वास या विजयाला कारणीभूत आहे. राजुदास जाधव व ‘सहकार पॅनल’ च्या सर्व विजयी उमेदवारांचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे , संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे