राजेंद्र देशमुख यांची राज्य फेडरेशनच्या निमंत्रित संचालक पदी निवड
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राजेंद्र देशमुख यांची राज्य फेडरेशनच्या निमंत्रित संचालक पदी निवड
कोपरगाव : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निमंत्रित संचालक पदी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव सारख्या ग्रामीण भागातील राजेंद्र मधुकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
प्रसंगी राजेंद्र देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे कामकाज अधिक वेगाने करणार असून वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार आहोत. तसेच कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था चळवळ भक्कम बनविणार आहोत.
गेल्या ३५ वर्षापासून राजेंद्र देशमुख हे सहकारात कार्यरत आहेत. कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत त्यांचे मोलाचे योगदान असून तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक देखील आहेत. सुरेगाव सारख्या ग्रामीण भागातील परिसर व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन असून ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना पत निर्माण करून देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे, उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे, संचालक मंडळ आदींनी या निवडीबद्दल राजेंद्र देशमुख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.