सहकार मंत्र्यांच्या हस्ते तुपकरांचा गौरव…
जालना : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था जुन्नर व जुन्नर तालुका पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सक्षम सहकारी पतसंस्था पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे खजिनदार व सहकारी पतसंस्था चळवळीतील कायदे तज्ञ दादाराव तुपकर यांना ‘सहकार जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करून सहकार क्षेत्रात त्यांना गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अतुल बेनके, महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादाराव तुपकर यांना सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीत देत असलेल्या महत्वपूर्ण योदानाबद्दल मिळाला जालना जिल्ह्यातील राज्यात अग्रगण्य अशा महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष पद भूषवित आहे.तसेच चिखली अर्बन बँकेचे संचालक पद ही त्यांच्याकडे आहेत. त्यांना पतसंस्था चळवळीत ‘नाना’ या टोपण नावाने ओळखले जाते.
त्यांना मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. तसेच पतसंस्था चळवळीत त्यांच्या हातून अशीच अनेक महत्त्वपूर्ण कामे व्हावीत.अशी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.