आष्टी पतसंस्थेने सर्वसामान्य ग्राहकांचा विश्वास कमावला – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
आष्टी पतसंस्थेने सर्वसामान्य ग्राहकांचा विश्वास कमावला – काका कोयटे, अध्यक्ष
आष्टी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडासारख्या १० ते १५ हजार लोक वस्ती असलेल्या गावात आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ६५ कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक पार करून संस्थेने सर्वसामान्य ग्राहक, नागरिकांचा विश्वास कमावला आहे. अशा सर्वसामान्य ग्राहक, नागरिकांना प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या संस्थेच्या शाखेचे उद्घाटन करण्याचा योग आला असून ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कडा येथील शाखेचे उद्घाटन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते २१ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सहाय्यक निबंधक बी.जे.शिंदे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन डॉ.विलास सोनवणे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी संस्थेच्या सुविधा व आष्टी तालुक्यातील सभासदांना देत असलेल्या प्रामाणिक सेवेबद्दलची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक काकासाहेब पोकळे यांनी केले. या वेळी आष्टी व संस्थेचे चेअरमन डॉ.विलास सोनवणे व्हा. चेअरमन नवनीत कटारिया, संचालक निवृत्तीराव उगले, विद्यासागर शेठी डॉ. सुजय सोनवणे, सय्यद अहमद, नकुल गुरव, बबन बन, भानुदास खंडागळे, संचालिका राजामती भोसले, सुनिता खाडे आदींसह संस्थेचे सभासद, हितचिंतक, कडा भागातील ग्रामस्थ, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार व्हा.चेअरमन नवनीत कटारिया यांनी मानले.