काका कोयटेंच्या हस्ते वाई येथील सायकल रॅलीचा शुभारंभ…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

काका कोयटेंच्या हस्ते वाई येथील सायकल रॅलीचा शुभारंभ…
वाई : वाई येथील उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था व वाई जिमखाना आयोजित वाई फेस्टिव्हलचे हे १६ वे वर्ष आहे. या वर्षी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मरणार्थ भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सायकल रॅलीचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या शुभ हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था ही लिक्विडटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.८० टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित करणारी संस्था आहे. श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी पतीच्या निधनानंतर यशस्वीपणे संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली आहे. सहकारी पतसंस्थांमधील महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
रॅलीला वाईकरांनी भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायकल रॅलीतून शहीद जवानांचे स्मरण व ‘प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देण्यात आला. या रॅलीत ५०० पेक्षा अधिक सायकल स्वार सहभागी झाले होते.
उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काका कोयटे यांच्या हस्ते कराड येथील राष्ट्रीय खेळाडू निलेश फणसळकर (बॅडमिंटन), नॅशनल गेम्स ऑफ इंडियामध्ये सांघिक सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नेहा सुनील क्षीरसागर, पल्लवी श्रीकांत शिंदे, सई किरण शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे ज्येष्ठ सभासद सोमनाथ स्वामी खास भुईंज वरून या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते त्यांचा ही सत्कार करण्यात आला.
या वेळी वाई फेस्टिवलचे अध्यक्षा डॉ.मंगला अहिवळे, कोषाध्यक्ष ॲड. रमेश यादव, सचिव सुनील शिंदे व निमंत्रक अमर कोल्हापुरे यांनी वाई फेस्टिवलमधील सर्वच कार्यक्रमांना वाईकरांनी उत्स्फूर्त व भरभरून प्रतिसाद द्यावा.असे आवाहन यांनी केले. तसेच उत्कर्ष पतसंस्थेचे अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे , फेस्टिव्हल समिती सदस्य मदन साळवेकर, श्रीकांत शिंदे, शरद चव्हाण, सलीमभाई बागवान, संजय वाईकर, सागर मुळे, वैभव फुले, भूषण तारू, नीला कुलकर्णी, अलका घाडगे, शैलेंद्र गोखले, अमीर बागुल, नितीन वाघचौडे, तुकाराम जेधे, सौ. प्रिती कोल्हापुरे, ॲड.आनंद डुबल, मदन पोरे, समीर पवार, प्रकाश पवार अणि उत्कर्ष पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.