कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीत ‘सहकार विकास पॅनल’ चा दणदणीत विजय
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीत ‘सहकार विकास पॅनल’ चा दणदणीत विजय
कोपरगाव तालुक्यातील पतसंस्थांचे कामकाज अधिक वेगाने व दमदारपणे पुढे नेण्याचे ठरवले आहे. वेळोवेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे तसेच सहकारी पतसंस्थांच्या थकबाकीदारांविरुद्ध सामुदायिकपणे वसुलीची कारवाई करण्याचा संकल्प विजयी उमेदवारांनी या प्रसंगी केला.
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे, पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन औताडे, ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवीकाका बोरावके यांचे नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार विकास पॅनल’ दणदणीत विजय झाला असून या पॅनल मधील उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळविलेला आहे.
निवडणुकीपूर्वीच या पॅनलच्या ५ जागा बिनविरोध झालेल्या होत्या. संतोष सोमनाथ गायकवाड यांची अनुसूचित जाती / जमाती, हेमंत विठ्ठलराव गिरमे यांची इतर मागास प्रवर्ग, लता बाळासाहेब बनकर, चित्रा गंगाधर वडनेरे यांची महिला राखीव तर राजेंद्र निवृत्ती कोळपे यांची भटक्या विमुक्त, जाती / जमाती, विशेष मागास प्रवर्ग या राखीव मतदार संघातून बिनविरोध निवड झाली आहेत.
उर्वरित ६ जागांसाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या पैकी ‘सहकार विकास पॅनल’ चे सर्वसाधारण मतदार संघातून दादासाहेब रामचंद्र औताडे, राजेंद्र मधुकर देशमुख, आशुतोष विनायक पटवर्धन, ज्ञानदेव दगू मांजरे, रंगनाथ सखाराम लोंढे, गुलाबराव बाजीराव वरकड हे ६ उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी झालेले आहेत.
कोपरगाव येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात २८ जानेवारी २०२४ रोजी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णा वाळके यांनी काम पाहिले. निवडणुकीसाठी अनेकांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला होता.परंतु सतीश निळकठ यांनी तो मिळवून दिला.