सहकारी पतसंस्थांच्या कामकाज पद्धतीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या लघु चित्रपटाचा लोकार्पण सोहळा संपन्न..
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकारी पतसंस्थांच्या कामकाज पद्धतीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या लघु चित्रपटाचा लोकार्पण सोहळा संपन्न..
नागपूर : भारतीय इतिहासात प्रथमच सहकारी पतसंस्थांच्या कामकाज पद्धतीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन निर्मित ‘पत दर्शन’ या लघु चित्रपटाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या शुभ हस्ते नागपूर मधील रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
प्रसंगी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, या लघु चित्रपटामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था चळवळीतील पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक यांचे प्रशिक्षण होणार आहे. तसेच या लघु चित्रपटा द्वारा संचालक, अधिकारी, ठेवीदार यांचे ही प्रबोधन करावे. हा लघु चित्रपट हिंदी व इंग्रजी भाषेत डब केल्यास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन देशात व परदेशात या चित्रपटाचे प्रकाशन करील.
उदयन ब्रम्ह लिखित पत दर्शन या लघु चित्रपटाचे निर्माता गौरंग राजकारणे, दिग्दर्शक निखिल टोंगळे असून सत्यशील वासेकर यांनी संपादित केलेला आहे. श्वेता पत्की, यशवंत चोपडे, नितीन पत्रीकर, मंगेश बावसे, रवी संगवाई, विनय मोडक, मनीष चौधरी, स्वाती मोहरीर, श्याम अस्करकर, किशोर पत्की, दिलीप मुळे, दिपाली घोंगळे, रौनक पळसपुरे, विनायक क्षोत्री, वर्षा कोट्टवर, मयुरी टोंगळे आदींनी वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून भूमिका केल्या आहेत.
या वेळी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडे, शिक्षक सहकारी बँक अध्यक्ष माजी आमदार अनिल सोले, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र घाटे, उपाध्यक्ष मोरेश्वर मंगरूळकर, धरमपेठ महिला मल्टीस्टेट सोसायटी अध्यक्षा सौ नीलिमा बावणे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तज्ञ संचालक हरिभाऊ किरपाने, शिव प्रिया सहकारी पतसंस्था संचालक किशोर भागडे, सेवा श्री साई सहकारी पतसंस्था अध्यक्ष मंगेश सातपुते, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक आशिषजी मुकीम आदी मान्यवर व नागपूर जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.