विश्वकर्मा पतसंस्था प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संस्था – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
विश्वकर्मा पतसंस्था प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संस्था – काका कोयटे, अध्यक्ष
संगमनेर : शहरातील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेने तीस वर्षात १२ कोटी रुपयांच्या ठेवी , ८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप आणि ६ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत संचालक मंडळाचे मीटिंगमध्ये चहा पाणी व मीटिंग भत्त्यासाठी १ रुपया देखील खर्च झालेला नसून सुतार, लोहार कष्टकरी समाज बांधवांची पतसंस्था असून अतिशय काटकसरीने कामकाज चालते. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
संगमनेर येथील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेला २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सदिच्छा भेट दिली असता विश्वकर्मा पतसंस्थेचे चेअरमन, संचालक , अधिकारी आदींना मार्गदर्शन करत संस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
पुढे म्हणाले की, संस्थेचे एखादे कर्ज वसूल झाले नाही, तर संचालक वर्गणी करून कर्ज भरतात. संस्थेच्या स्थापनेपासूनच्या सर्व माजी संचालकांची ३ महिन्यातून एकदा मीटिंग घेण्यात येते. तसेच नूतनीकरण केलेल्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाची कोणत्याही वर्तमानपत्राला जाहिरात दिलेली नाही. तर स्वतः कार्यक्रम पत्रिका संचालक व कर्मचाऱ्यांनी वाटल्या. वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश वाटपाचा ठराव मंजूर झाल्याबरोबर ५ मिनिटात सभासदांच्या बचत खात्यावर लाभांश रक्कम जमा होते. पतसंस्था चळवळीतील अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चालवलेल्या संस्था बघून आनंद व अभिमान वाटला.
या वेळी संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक, संस्थेचे चेअरमन देविदास गोरे, व्हा.चेअरमन अशोकराव वाकचौरे, संचालक राजेश वाकचौरे, ॲड.राजु खरे, डॉ.गोरक्ष राऊत, विजय सू्यवंशी, प्रवीण रोकडे व्यवस्थापक अरुण उदमले आदींसह अधिकारी, कर्मचारी , सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक राजेश वाकचौरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार देविदास गोरे यांनी मानले.