Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळ सक्षम व सुदृढ बनविण्यात पारनेर पतसंस्थेचा सिंहाचा वाटा – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 6 1 7

पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळ सक्षम व सुदृढ बनविण्यात पारनेर पतसंस्थेचा सिंहाचा वाटा – काका कोयटे, अध्यक्ष

पारनेर : पारनेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने तालुक्यात ३१ डिसेंबर २०२३ अखेर २४० कोटी ३२ लाख व यांच्या ठेवी जमा केल्या असून कर्ज वाटप १७४ कोटी ३७ लाख इतके आहे. गुंतवणूक ८५ कोटी १८ लाख केली असून स्वनिधी २२ कोटी ४२ लाख रुपये असल्याने ग्रामीण भागात आर्थिक दृष्ट्या प्रगतीचा ठसा उमटविलेला आहे. ग्रामीण भागातील पतसंस्थांना भविष्यात दिशादर्शक असून पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळ सक्षम व सुदृढ बनविण्यात सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व राज्य मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील पारनेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट देऊन संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्याशी मार्गदर्शनपर संवाद साधून संस्थेच्या विविध विषयांवर चर्चा केली. त्या वेळी ते बोलत होते.

तसेच राज्य मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी पारनेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी पारनेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष काशिनाथ दाते यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा सत्कार करून यथोचित सन्मान केला. मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या सत्कार कान्हूर पठार मल्टीस्टेटच्या कार्यकारी संचालिका नमिता ठुबे यांनी केला.

या वेळी वसंत निघोज पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद, व्हा.चेअरमन नामदेवराव थोरात, कान्हूर पठार मल्टिस्टेटच्या चेअरमन श्रीमती सुशिला ठुबे, कार्यकारी संचालिका नमिता ठुबे , संचालक भिवाजी रसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके व सुभाष थोरात, पारनेर पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

3.2/5 - (6 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 6 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे