वाढदिवसानिमित्त नागपूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ आणि गिरणार अर्बन आयोजित निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
रक्तदान केल्यानंतर प्रमाणपत्र देताना ब्लड बँकेचे अधिकारी व उपस्थित मान्यवर.
वाढदिवसानिमित्त नागपुर जिल्हा पतसंस्था फेडरेशन व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ आणि गिरनार अर्बन आयोजित निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
उपस्थित पतसंस्थांच्या प्रतिनिधींची आरोग्य तपासणी करताना रिसर्च सेंटरचे अधिकारी व मदतनीस.
कोपरगाव : भारतातील सहकाराचा ठसा परदेशात उमटवणारे असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू) चे संचालक व कोषाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीचे शिरोमणी ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त नागपूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ आणि गिरनार अर्बन क्रेडिट को-ऑप.सोसायटी नागपूर यांचे संयुक्तपणे आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीर “राजकमल” ५०२/०१, नंदनवन मेन सिमेंट रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया नागपूर येथे उत्साहात संपन्न झाले.
निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण कक्षात उपस्थित मान्यवर.
शिबिरात नागपूर जिल्ह्यातील ४०० हून अधिक पतसंस्था प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.यात प्रामुख्याने बोन डेन्सिटी चेक अप ,रक्त तपासणी व शुगर तपासणी,जनरल चेक अप, नेत्र तपासणी, इ.सी.जी. आदींचा समावेश होता. तसेच रक्तदान देखील करण्यात आले. या साठी नागपूर येथील श्री नवरात्र मेडिकल अँड रिसर्च सेंटर क्वेटा आणि लाईफ लाईन ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले.
रक्तदान करताना विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी.
या वेळी पूर्व नागपूर विधानसभा आमदार मा.श्री कृष्णाजी खोपडे,श्री नवरात्र मेडिकल अँड रिसर्च सेंटर अध्यक्ष श्री.प्रफुलजी गणात्रा, नागपूर जिल्हा पतसंस्था फेडेरेशन व गिरनार पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.राजेंद्रजी घाटे,उपाध्यक्ष श्री.मोरेश्वरजी मांगुळकर, संचालक मनोजजी पांडे,जयंतजी दाढे, नरखेड तालुका पतसंस्था फेडरेशन संचालक श्री. सारंगजी गाडगे, उमरेड तालुका पतसंस्था फेडरेशन संचालक श्री.नंदूजी कन्हेर, हिंगणा तालुका पतसंस्था फेडरेशन संचालक श्री.किरणजी रोकडे, उत्तर नागपूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालक श्री.वामनजी नायगावकर, संचालक रामटेक तालुका पतसंस्था फेडरेशन तज्ञ संचालक श्री.हरिभाऊजी किरपाने, राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री.विकासजी गवते, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.डिम्पल घाटे, गिरनार अर्बन क्रेडिट को-ऑप.सोसायातीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विलासजी लेंडे, व्यवस्थापक श्री.निलेशजी रेवस्कर आदींसह नागपूर जिल्हा पतसंस्था संघाचे पदाधिकरी, अधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.