Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य फेडरेशनच्या वतीने राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे राजेंद्र वाबळे व साहेबराव निदाने यांचा सत्कार

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 8 1 4 1

राज्य फेडरेशनच्या वतीने राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे राजेंद्र वाबळे व साहेबराव निदाने यांचा सत्कार

राहाता : राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या नूतन अध्यक्ष पदी राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र दत्तात्रय वाबळे आणि उपाध्यक्ष पदी स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव खंडूजी निदाने यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी राहता तालुक्यातील ठेवीदारांच्या सातभाई मर्चंट बँकेतील अडकलेल्या ठेवी परत मिळविण्याबाबत कोपरगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून पुढील आठवड्यात व्यापक बैठकीचे आयोजन करणार आहेत.

तसेच राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन तालुक्यातील पतसंस्था चळवळ बळकट करण्यासाठी राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संयुक्तपणे काम करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र वाबळे व उपाध्यक्ष साहेबराव निदाने यांनी सांगितले.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 1 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे