Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने शिंदेंचा सन्मान…

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 8 1 4 1

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिंदेंचा सन्मान…

ठाणे : येथील एकता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे स्वीकृत सदस्य आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सर्जेराव तथा आबा शिंदे यांनी सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपजी वळसे पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘सहकार जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

    जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था जुन्नर व जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित ‘सक्षम सहकारी पतसंस्था पुरस्कार सोहळ्या’त पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या वेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अतुल बेनके, महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      ठाणे जिल्ह्यात एकता नागरी सहकारी पतसंस्थेसह इतर पतसंस्था , मल्टिस्टेट पतसंस्थांच्या माध्यमातून सहकारातील पतसंस्था चळवळीला भक्कम स्वरूप दिले असून ही चळवळ बळकट करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. ते महाराष्ट्रातील शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या स्वीकृत संचालक पदावरून ही उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून ही त्या – त्या क्षेत्रात मौलिक योगदान देत आहे. ते पतसंस्था चळवळीत आबा या नावानेही परिचित आहे.

        त्यांना मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत त्यांच्या हातून अशीच अनेक महत्त्वपूर्ण कामे व्हावीत.अशी अपेक्षा पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

1.8/5 - (5 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 1 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे