Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या पदोन्नतीपर बदलीमुळे राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सत्कार समारंभ

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 6 1 7

सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या पदोन्नतीपर बदलीमुळे राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सत्कार समारंभ

सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांचा सत्कार करताना राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे व इतर पदाधिकारी

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या आस्थापने परसेवेवर कायदा कलम १०१ चे वसुली दाखले देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन आस्थपने परसेवेवर सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे रुजू झाले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे जिल्हा उपनिबंधक पदावर बढती होऊन त्यांची बदली झाली आहे. त्यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन वरील आस्थपने परसेवेवरचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यांनी उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची जिल्हा उपनिबंधक म्हणून पदोन्नतीपर बदली झाली आहे. अशा प्रकारचे अधिकारी सहकार खात्याचा गौरव वाढविणारे असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी बाळासाहेब तावरे यांची पदोन्नतीपर बदलीबद्दल त्यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते.

सहाय्यक निबंधक हर्षत तावरे यांचा सत्कार करताना राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी व इतर पदाधिकारी

बाळासाहेब तावरे यांनी त्यांच्या ६ महिन्यांच्या कालावधीत दाखल झालेल्या १६४१ १०१ प्रकरणांपैकी १२७९ दावे निकाली काढले आहेत. राज्यातील विविध भागात जाऊन सुनावण्या घेऊन दाखले देण्याचा विक्रम केला आहे. विशेषतः अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर, नाशिक या भागातील पतसंस्थांना अधिकाधिक दाखले दिले आहे. त्यांनी सरासरी १ दाखला ३८ दिवसात दिला असून राज्यातील पतसंस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सुनावनीसाठी आलेल्या पतसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगली वागणूक दिली. तसेच कोणत्याही थकबाकीदाराने तक्रार देखील केली नसल्याचे राज्य फेडरेशनच्या कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी सांगितले.

आता बाळासाहेब तावरे यांच्या जागेवर सहाय्यक निबंधक म्हणून हर्षत तावरे हे अधिकारी आले असून हे ही त्यांच्या प्रमाणेच कार्य करून सहकार खात्यातील गौरवास्पद अधिकारी होतील.असा आशावाद महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक वासुदेव काळे यांनी व्यक्त केला. तर जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सहकार खाते यांनी हातात हात घालून काम केल्यास सहकार खात्याचे भविष्य उज्वल होऊ शकते.

बाळासाहेब तावरे यांचा सत्कार राज्य पतसंस्था फेडरेशन संचालक वासुदेव काळे यांच्या हस्ते तर नूतन सहाय्यक निबंधक हर्षत तावरे यांचा सत्कार राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सहकार खात्यातील वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी , हितचिंतक, राज्य पतसंस्था फेडरेशन चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

2.5/5 - (8 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 6 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे