रूपामाताच्या दिनदर्शिकेमुळे जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीची प्रतिष्ठा वाढणार – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
रूपामाताच्या दिनदर्शिकेमुळे जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीची प्रतिष्ठा वाढणार – काका कोयटे,अध्यक्ष
धाराशिव : रूपामाता अर्बन को – ऑप.सोसायटी व रुपामाता मल्टिस्टेटचे आदर्शवत कार्य व्यंकटराव गुंड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तसेच रूपामाता अर्बन व मल्टीस्टेट धाराशिव जिल्ह्यातील इतर सहकारी पतसंस्थांना आर्थिक दृष्ट्या मार्गदर्शक ठरत आहे. रूपामाताची दिनदर्शिका धाराशिव जिल्ह्यातील सभासदांच्या घराघरातील भिंतीवर लागणार असून यामुळे जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीची प्रतिष्ठा वाढणार असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
धाराशिव येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात रूपामाता नागरी सहकारी पतसंस्थेची दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पुणे येथील दि विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, रूपामाता पतसंस्थेचे चेअरमन व्यंकटराव गुंड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले यांनी केले. तसेच रूपामाताचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पुणे येथील दि विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी व फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी चर्चासत्राला १५० हून अधिक उपस्थित सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींसह रूपामाता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन सुधाकर पवार, संचालिका सौ.सुमन सावंत, सौ. द्रोपदी ढाकरे, सौ.कस्तुरबाळी जाधव, सौ.भाग्यश्री जाधव, श्रीमती सरोजा पुरी, संचालक शंकर गाडे, सुर्यकांत गरड, नामदेव ढोले, तज्ञ संचालिका सौ.वैशाली गाजरे, सौ.आशा सोनटक्के, मानद सल्लागार भगिरथ जोशी आदीसह रूपामाता उद्योग समुहाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर यांनी मानले.