ओझर्डे व पांचवड गावातील पतसंस्थांना सदिच्छा भेट…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
ओझर्डे व पांचवड गावातील पतसंस्थांना सदिच्छा भेट…
वाई : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व पदाधिकाऱ्यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे या गावातील श्री पद्मावती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि पाचवड गावातील नवलाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला १० डिसेंबर २०२३ रोजी सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी श्री पद्मावती पतसंस्था व नवलाई पतसंस्थेच्यावतीने राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी काका कोयटे यांनी सदर पतसंस्थांची आर्थिक परिस्थिती व त्या पतसंस्थांचे चालणारे कामकाजावर समाधान व्यक्त करत संवाद साधला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांचे जाळे विणले गेले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पतसंस्था या अधिक सुरक्षित आहे. तसेच त्या आदर्शवत काम करत आहेत. ओझर्डेत श्री पद्मावती पतसंस्था व पांचवड हा देखील एक ग्रामीण भाग असून या भागात नवलाई पतसंस्था भक्कम स्थितीत उभ्या असून ग्रामीण भागातील सर्व सामान्य सभासदांची पत सुधारण्याचे काम त्या करत आहे. ग्राहक, सभासदांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी त्यांचे सतत वेगवेगळ्या योजना व उपक्रमांद्वारा प्रयत्न चालू असतात.
दोन्ही पतसंस्थांना सदिच्छा भेट दिली असता, श्री पद्मावती पतसंस्थेचे चेअरमन रावता फरांदे, संचालक बाळासाहेब पाटील, ॲड.उदयसिंह पिसाळ, भगवान धुमाळ, राजेंद्र निकम, विजय खरात, संजय कदम, संदीप निकम, राजेंद्र पिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जमील इमानदार व नवलाई पतसंस्थेचे चेअरमन आनंदराव गायकवाड, संचालक सयाजी शेवाळे, वसंत शेवाळे, मनोहर निकम, मोहन कुचेकर, वासू मोरे, अनिल पवार, हणमंतराव वाघ आदींसह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.