Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील पतसंस्था चळवळ वाढीसाठी प्रयत्न करणार – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 8 9 7 9

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील पतसंस्था चळवळ वाढीसाठी प्रयत्न करणार – काका कोयटे, अध्यक्ष

पाथर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यात ८१ पतसंस्था आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील हि संख्या सर्वात कमी आहे. या तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची चळवळ वाढली पाहिजे. त्या साठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सहकार खाते हातात हात घालून काम करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पाथर्डी व शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी संघाच्या सहकार्याने पतसंस्थांच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण वर्ग व दोन्ही तालुक्यातील पतसंस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी भूषविले.

पुढे म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात १६ नागरी व ७ पगारदार अशा २३ आणि शेवगाव तालुक्यात ४९ नागरी व ९ पगारदार अशा ५८ पतसंस्था असून दोन्ही तालुक्यात एकूण ८१ सहकारी पतसंस्था आहेत. दोन्ही तालुक्यातील ड वर्गातील पतसंस्था क वर्गात, क वर्गातील पतसंस्था ब वर्गात, ब वर्गातील पतसंस्था अ वर्गात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तर पाथर्डी तालुक्याचे सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात नवीन पतसंस्था सुरू करावयाची असल्यास माझे नेहमी सहकार्य असेल. त्यासाठी तालुक्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते माझ्याशी केव्हाही संपर्क साधू शकता. या तालुक्यात पतसंस्था वाढीसाठी सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाचे नेहमी प्रोत्साहन मिळेल.

राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ‘कलम १४४’ या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांनी ‘व्यवस्थापकीय कामकाज’, अनिरुद्ध देवचक्के यांनी ‘संवाद कौशल्य’, प्रशांत भालेराव यांनी ‘लेखा परीक्षण’, सुशांत वाडीले यांनी ‘कलम १०१ व १५६’ आणि ‘र – प्रमाणपत्र’ या बाबत मार्गदर्शन केले.

या वेळी सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे (पाथर्डी) यांची प्रमुख उपस्थिती होती. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे संचालक उमेश मोरगावकर व पांडुरंग करंजे यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्थैर्य निधी संघाचे व्यवस्थापक महेश जाधव यांनी मानले.

1.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे