Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था सर्वसामान्यांचा आधार – दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 2 4 4

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था सर्वसामान्यांचा आधार – दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री

जुन्नर : महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीतील पतसंस्था या सर्वसामान्यांचा आधार असून हा आधार बळकट झाला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था जुन्नर व जुन्नर तालुका पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सक्षम सहकारी पतसंस्था पुरस्कार सोहळा’ व प्रशिक्षण शिबिराच्या आयोजना प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षीय मनोगतात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे विविध प्रश्न मांडून त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात यावेत.अशी मागणी व्यक्त केली.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वागत जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर यांनी केले. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या बाबत अहवाल सादर करण्याचा आदेश मा. मंत्री महोदय यांनी दिला.

तद्नंतर सहकार खात्याचे पुणे विभागाचे सहनिबंधक शिर्के, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, सहायक निबंधक सचिन सरसमकर राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, खजिनदार दादाराव तुपकर, कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते.

2.5/5 - (8 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 2 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे