Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकारी पतसंस्थांच्या वेअर हाऊसला परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी माझी – राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 8 1 4 0

सहकारी पतसंस्थांच्या वेअर हाऊसला परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी माझी – राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री

कोल्हार : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांनी वेअर हाऊस बांधण्यास सुरुवात करावी. त्यांना परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल. असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोल्हार येथील शाखा स्थलांतर सोहळ्या प्रसंगी काढले.

कोपरगाव येथील ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचा कोल्हार शाखा स्थलांतर सोहळा महाराष्ट्राचे माजी मंत्री मान.अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती पतसंस्थेचे चेअरमन रवी काका बोरावके यांनी केले.

प्रास्ताविकात ते म्हणाले की, गत ३५ वर्षात ३१६ कोटी रुपयांच्या ठेवी ठेवीदारांकडून कडून जमा केल्या असून २६० कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.तसेच संस्थेची थकबाकी शुन्य टक्के असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था व अहमदनगर बँकेविषयीचे विविध प्रश्न रवी काका बोरावके यांनी प्रास्ताविकातून मांडले.

अध्यक्षीय मनोगतात अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या असणाऱ्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करून ते सोडविण्याचा प्रयत्न करू. असे आश्वासन दिले.

राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील हे सहकारी पतसंस्था चळवळीचे संकट मोचक आहे. ज्या ज्या वेळी राज्यातील सहकारी पतसंस्थांवर संकटे येतात, त्या त्या वेळी ते आमच्या मागे खंबीर पणे उभे राहतात. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभदायक ठरले आहे.

2/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 1 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे