Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पतसंस्थाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार – श्री.शैलेश कोतमिरे, सहकार आयुक्त

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 6 7 0 3

पतसंस्थाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार – श्री.शैलेश कोतमिरे, सहकार आयुक्त

 श्रीरामपूर : राज्यातील सहकारी पतसंस्था विविध प्रश्नांना सामोरे जात आहेत. त्यांच्या अडचणी व प्रश्नांची मला जाणीव असून त्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही राज्याचे सहकार आयुक्त श्री. शैलेशजी कोतमिरे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ व श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्थाची आढावा बैठक अपूर्वा हाॅल, श्रीरामपूर येथे संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते.

एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची सरकार व सहकार विभागाची भुमिका त्यांनी या वेळी समजून सांगितली. तसेच थकित कर्जदारांवर कारवाई करताना येणार्‍या अडचणी सोडवण्यावर अधिक भर देणार असून पतसंस्था सक्षमीकरणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशनचे काम कौतुकास्पद असून फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे यांचे काम नोंद घेण्यासारखे आहे.

अध्यक्षीय मनोगतात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी पतसंस्थाचे विविध प्रश्न सहकार आयुक्तांसमोर मांडले. ही चळवळ आपल्यासारखे सहकारातील अभ्यासू अधिकार्‍यामुळे सक्षम आहेच, पण या चळवळीच्या वाढीस आपल्या सहकार्याची गरज असून आमचे प्रश्न आपण तातडीने सोडवावेत.अशी आग्रही मागणी या वेळी केली. श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशन वर्षभर पतसंस्था सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असते. तालुका फेडरेशनच्या विविध उप्रक्रमांचे कौतुक करतानाच हे फेडरेशन राज्यात आर्दशवत आहे.

श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे तालुक्यातील पतसंस्था चळवळीचा लेखा – जोखा मांडताना प्रास्ताविकात म्हणाले की, तालुक्यातील सहकारी पतसंस्थांकडे ५०० कोटीपेक्षा अधिक ठेवी असून गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर जिल्हा बॅंकानी पतसंस्थाना वाढवून देण्यासाठी आपण लक्ष घालावे अशी विनंती केली.

सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे व विविध पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे स्वागत अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. नाशिक विभागीय सहकार आयुक्त विलास गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पतसंस्थाच्या पदाधिकार्‍यांनी आपले विविध प्रश्न आयुक्तांसमोर मांडले.

या बैठकीला श्रीरामपूरसह विविध तालुक्यातील पतसंस्थाचे प्रतिनिधी, तालुका पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, स्थैर्य निधी संघाचे संचालक, तालुका पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, संचालक, मॅनेजर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन दिगंबर कुलकर्णी यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिरुध्द महाले यांनी केले.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 7 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे