ठेवीदारांनी गंगोत्रीवरील विश्वास वृध्दींगत करावा – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
ठेवीदारांनी गंगोत्रीवरील विश्वास वृध्दींगत करावा – काका कोयटे, अध्यक्ष
शेवगाव : गंगोत्री पतसंस्थेचे सर्वेसर्वा डॉ.ॲड.विद्याधर काकडे हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. त्यांनी केवळ शेवगाव पुरतेच त्यांचे नेतृत्व न ठेवता राज्यभरातील पतसंस्थांना सक्षम होण्यासाठी मदत करावी. गंगोत्री पतसंस्थेच्या ठेवी १० कोटी रुपयांच्या असून ७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. या पतसंस्थेने सहकार खात्याच्या सर्व निकषांचे पालन केले असल्यामुळे भविष्यात निश्चितच भरारी घेईल. त्यामुळे ठेवीदारांनीही गंगोत्री पतसंस्थेवरील विश्वास वृध्दींगत करावा.असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील गंगोत्री पतसंस्थेच्या कार्यालयाचे स्थलांतर व नूतनीकरण उद्घाटन आणि सोनेतारण कर्ज सुविधा शुभारंभ राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काका कोयटे यांचा सत्कार गंगोत्री पतसंस्थेचे सर्वेसर्वा डॉ.ॲड.विद्याधर काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गंगोत्री पतसंस्थेचे चेअरमन गोविंद वाणी यांनी संस्थेची आर्थिक स्थिती व ग्राहकांना देत असलेल्या सुविधांची सविस्तर माहिती दिली. तसेच शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गंगोत्री पतसंस्थेने सोनेतारण सुविधा शुभारंभ केला असून त्यांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. असे आवाहन अध्यक्षीय मनोगतातून गंगोत्री पतसंस्थेचे सर्वेसर्वा ॲड.विद्याधर काकडे यांनी केले.
या कार्यक्रमास जि.प. सदस्या हर्षदा काकडे, सुधीर सबलोक, अंकुश देवळे, द्वारकानाथ लाहोटी, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, श्रीमती मंदाकिनी पूरनाळे, लक्ष्मण बिटाळ, रावसाहेब बर्वे, कारभारी मरकड, राजेंद्र फलके, अशोकराव ढाकणे, मंदाकिनी भालसिंग, वंदना पुजारी, आबासाहेब काकडे, मधुकर देवणे, ओमप्रकाश धूत, अँड. अविनाश मगरे, ॲड. बुधवंत, ॲड. कारभारी गलांडे, ॲड. शेळके, रोहिदास पातकळ, राजेंद्र ढाकणे, अजय नजन, प्रल्हाद पुंडे, राजेंद्र झरेकर, शिवाजीराव औटी, भाऊसाहेब पोटभरे, नामदेव ढाकणे, भारत लांडे, अशोक ढाकणे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, कुमार क्षीरसागर, रामकिसन सांगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जरीना शेख यांनी केले. उपस्थितांचे आभार अशोक आहेर यांनी मानले.