Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांविषयी तातडीने बैठक बोलविण्याची सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिली – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 8 1 4 1

सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांविषयी तातडीने बैठक बोलविण्याची सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिली – काका कोयटे, अध्यक्ष

जुन्नर : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ सर्व सामान्यांची, सर्वसामान्यां करीता निर्माण झालेली चळवळ आहे. त्यामुळे ही चळवळ टिकली व वाढली पाहिजे. यासाठी मंत्रालयात सहकार मंत्री, सचिव, आयुक्त यांच्या समवेत बैठका आयोजित करण्याच्या सुचना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार खात्यातील शासकीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितली.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या ८ ते १० हजार लोक वस्ती असलेल्या ग्रामीण भागातील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेने ८५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या असून ६५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ४५ कोटी रुपयांची गुंतवणूक व १५ कोटी रुपये स्वनिधीच्या माध्यमातून यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर ज्या इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, ती इमारत सहकारी पतसंस्था चळवळीसाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी या संस्थेचे कामकाज व भव्य दिव्य स्वरूपाची इमारत पाहण्यासाठी एकदा तरी अवश्य भेट द्यावी.

नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव या भागातील पतसंस्थांवर अनेक संकटे येऊन गेली विशेषतः कोरोना काळानंतर स्थावर मालमत्ता ताबा मिळत नसल्याने सहकार खात्याकडून अपसेट प्राईस मिळत नव्हती. हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्यानंतर त्यांनी अपसेट प्राईज देण्याची सूचना २ वर्षांपूर्वी दिली होती.तेव्हा सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी केली होती. तरी देखील सहकारी पतसंस्थांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महसूल व गृह खात्याशी संबंधित आहे. सहकार, महसूल व गृह खात्यातील प्रलंबित प्रश्ना बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका आयोजित करण्याच्या सुचना देऊन राज्यातील सहकारी पतसंस्थांचे विविध विभागाचे विविध प्रश्न सोडवून सहकारी पतसंस्थांना दिलासा द्यावा. अशी मागणी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केली असता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीकडून मन:पूर्वक धन्यवाद…

तसेच पतसंस्थांची बाजू मांडताना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी जुन्नर तालुक्यातील पतसंस्था चळवळीला योग्य दिशा देण्याचे काम करणारे राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर आणि आर्थिक क्षेत्रात उंच झेप घेत असलेल्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव वाघ व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण मंडलिक यांच्या ही कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वेळी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या प्रमुख उपस्थिती सह प्रमुख मान्यवर, संस्थेचे सभासद, तालुक्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार यशवंत पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण मंडलिक यांनी मानले.

1.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 1 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे