Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था अंशदान अंमलबजावणी विरोधात कायदेशीर लढा देणार – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 2 4 4

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था अंशदान अंमलबजावणी विरोधात कायदेशीर लढा देणार – काका कोयटे, अध्यक्ष

सांगली : बिगर कृषी पतसंस्था नियामक मंडळाने जारी केलेले परिपत्रक हे राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या हिताचे नाही. सहकार खात्याच्या या परिपत्रकामुळे राज्यातील सहकारी पतसंस्थांना अनेक अडचणी येऊ शकतात. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने या परिपत्रका विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या परवानगी शिवाय राज्यातील कोणत्याही पतसंस्थांनी अंशदान न देता अंशदान अंमलबजावणी विरोधात कायदेशीर लढा देऊया. असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, महासचिव शशिकांत राजोबा व सांगली जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन ए.डी.पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सांगली जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्तपणे बिगर कृषी पतसंस्था नियामक मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकाबाबत संयुक्तपणे बैठक राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते.

सांगली जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नूतन चेअरमन ए.डी. पाटील यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सत्कार करून सन्मान.

ते पुढे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने शासनास १ महिन्याच्या आत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. दाखल केलेल्या याचिकेमुळे राज्य फेडरेशन व सांगली जिल्हा फेडरेशन जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना न्याय मिळवून देईल.

बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी नियामक मंडळाने जारी केलेल्या अंशदान भरण्याबाबतच्या परिपत्रकाबाबतची सविस्तर माहिती दिली. यावर सांगली जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन पदाधिकारी व जिल्ह्यातील उपस्थित प्रतिनिधीं सोबत साधक – बाधक चर्चा होऊन अंशदान न भरण्याचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा, संचालक सागर चौगुले, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था चेअरमन रावसाहेब पाटील, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन एन.जे.पाटील, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए.डी.पाटील, संचालक अनिल लाड , लक्ष्मण डोंबाळे , रवींद्र भिंगारदेवे , दीपक शिंदे , सतीश कोरे, विलास लोंढे, अनिता वग्यानी व जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

4.2/5 - (8 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 2 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे