कर्मवीर मल्टीस्टेटची आर्थिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कर्मवीर मल्टीस्टेटची आर्थिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी – काका कोयटे, अध्यक्ष
कोल्हापूर : कर्मवीर मल्टीस्टेटचा ताळेबंद व संस्थेकडे असलेला स्वनिधी मुळे या संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. संस्थेकडे ठेवीदारांचा जमा होणारा पैसा संस्थेच्या मजबूत आर्थिक स्थितीमुळे सुरक्षित राहणार आहे. तसेच संस्थेकडे असलेल्या अद्यावत बँकिंग प्रणालीमध्ये क्यू.आर कोड च्या माध्यमातून थेट रक्कम जमा करण्याची सुविधा देखील कार्यान्वित केली आहे. ग्राहकांना या सुविधेचा अधिक पारदर्शकपणे लाभ घेता येणार आहे. सामाजिक क्षेत्रातही संस्थेची उल्लेखनीय कामगिरी असून कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटीच्या दानोळी येथील शाखेचा नूतन वास्तु उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या शुभहस्ते व राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. तसेच संस्थेचे क्यु.आर.कोड सुविधा वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील व डाक्युमेंटरी फिल्मचे उद्घाटन महासचिव शशिकांत राजोबा यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
प्रारंभी संस्थेचे चेअरमन सागर चौगुले यांनी प्रास्ताविकात सांगितले की, दानोळी पंचक्रोशीतील सभासदांच्या सेवेमध्ये संस्थेच्या १७ व्या नूतन वास्तूचे लोकार्पण करताना आनंद होत आहे.तर मल्टीस्टेट फेडरेशनचे मार्गदर्शक अॅड.एस.एस.गडगे म्हणाले, कर्मवीर संस्था मल्टीस्टेट कायद्याखाली अतिशय उत्तम वाटचाल करीत आहे.केंद्रीय सहकार खात्याकडून जारी केलेले आदर्श मापदंडा नुसार संस्था परिपूर्ण आहे. अध्यक्षीय मनोगतात शशिकांत राजोबा म्हणाले की, संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासन अत्यंत सचोटीने व पारदर्शक पद्धतीने कार्य करीत आहे. संस्थेकडे ५७५ कोटीच्या ठेवी, ३७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण असून लवकरच १ हजार कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण करील.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे स्वागत संचालक रावसाहेब पाटील यांनी केले. संस्थेच्यावतीने दानोळी गावातून प्रमुख पाहुणे व मान्यवरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. दक्षिण भारत जैन सभेचे सहखजिनदार अरविंद मजलेकर, कार्याध्यक्ष सुभाष मगदूम, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन एन.जे.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दानोळीचे सरपंच सौ.सुनिता वाळकुंजेे, उपसरपंच विपूल भिलवडे, कवठेसारचे सरपंच पोपट भोकरे आदींसह दानोळी परीसरातील सभासद, ग्राहक, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेचे व्हा.चेअरमन सौ.उज्वला मगदूम, संचालक सुकुमार पाटील, आदिनाथ किणींगे, भूपाल गिरमल, भरत गाट, अनिल भोकरे, कुमार पाटील, भाऊसो पाटील, रमेश पाटील, प्रा.आप्पा भगाटे, अमोल पाटील, अनिल गडकरी, पंकज ऐवाळे, सौ.उर्मिला मनोहर उपाध्ये, माजी संचालक प्रा.डी.ए. पाटील, विजय औटी व सल्लागार राकेश निल्ले उपस्थित होते.उपस्थितांचे आभार संचालक राजेंद्र नांदणे यांनी मानले.