तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती भक्कम करणे हिच कै.शंकरराव काळे व कै.शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली ठरेल – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती भक्कम करणे हिच कै.शंकरराव काळे व कै.शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली ठरेल – काका कोयटे, अध्यक्ष
कोपरगाव : कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन अंतर्गत येणाऱ्या सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती भक्कम करणार असून तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आर्थिक प्रगती ही स्व.शंकरराव काळे व स्व.शंकराव कोल्हे यांना श्रद्धांजली ठरणार आहे. असे उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनची पदाधिकारी निवड प्रक्रिया सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन ओताडे यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली. प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मध्ये राजकारण येऊ नये. राजकारणाचे जोडे बाहेर काढावे. अहमदनगर जिल्ह्याला सहकारातील पतसंस्था चळवळीची ऐतिहासिक परंपरा गेले अनेक वर्षापासून आहेत. ही परंपरा कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पुढे चालू ठेवावी.
या निवड प्रक्रियेत कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व संजीवनी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कोळपे यांची एकमताने तर उपाध्यक्ष म्हणून शंकरराव काळे साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे यांची निवड झाली. कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीत विद्यमान आमदार आशुतोष काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे ही सहकार्य लाभले होते.
अध्यक्षीय मनोगतात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपिन कोल्हे म्हणाले की, कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनला स्वमालकीचे कार्यालय व कर्मचारी उपलब्ध करून देणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ही तालुका पतसंस्था चळवळ भक्कम करण्यास सहकार्य करावे. तसेच सहकारी पतसंस्था फेडरेशन अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील धामोरी या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेणार असल्याचे नूतन उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी सांगितले.
या बैठकीचे सुत्रसंचालन औद्योगिक वसाहतीचे व्हा.चेअरमन केशवराव भवर यांनी केले. या वेळी कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे, सहकार खात्याचे निवडणूक अधिकारी कृष्णा वाळके, कोपरगाव, कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नूतन संचालक रंगनाथ लोंढे, दादासाहेब औताडे, आशुतोष पटवर्धन, राजेंद्र देशमुख, संतोष गायकवाड, हेमंत गिरमे, सौ.चित्रा वडनेरे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार नूतन संचालक गुलाबराव वरकड यांनी मानले.