सहकारी पतसंस्था चळवळीचा अभिमान गिरनार अर्बन को-ऑप.सोसायटी – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकारी पतसंस्था चळवळीचा अभिमान गिरनार अर्बन को-ऑप. सोसायटी – काका कोयटे, अध्यक्ष
नागपूर : गिरनार अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीचा अभिमान आहे. या संस्थेचे चेअरमन राजेंद्र घाटे व कार्यकारी संचालिका सौ.डिंपल घाटे यांनी पोटच्या मुलाप्रमाणे संस्थेला जपले आहे. तसेच सहकार खात्याने घालून दिलेल्या सर्व निकषांचे तंतोतंत पालन करीत आहे. त्यामुळे पुढील ६ महिन्यात संस्थेच्या ठेवी ८२ कोटी वरून १०० कोटी रुपयांपर्यंत नक्की पोहोचतील असा विश्वास असल्याचे उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयते यांनी काढले.
गिरनार अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पारडी शाखा कार्यालय उद्घाटन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या शुभ हस्ते व पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
तसेच राज्यातील विविध भागातील पतसंस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आधार देण्याचे काम महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन करत आहेत. त्याच धर्तीवर गिरनार अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी ही नागपूर मधील सर्वसामान्य जनतेला सहकार्य करीत असल्याचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ डिंपल घाटे यांनी केले.या उद्घाटन सोहळ्याला भवानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पांडुरंग मेहर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तज्ञ संचालक हरिभाऊ किरपाने, नागपूर जिल्हा पतसंस्था संघ संचालक गंगाधर लेंडे, श्री शुभ लक्ष्मी देवी सोसायटी अध्यक्ष राजेंद्र कापसे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, दिपक वाडीभस्मे, सौ.वैशाली वैद्य, सौ.कुमुदिनी कैकाडे, सौ.मोनाताई उपरे, देवेंद्र मेहेर, पारडी येथील प्रतिष्ठित नागरिक नरहरी तडसे, धोंडोबा थोपटे, जयश्री रारोकर, सुरेश लुणावत, डॉ.सुनील वलदे, ज्ञानेश्वर कळसाईत, नंदकिशोर अवचट आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यांनी मानले.