Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित धाराशिव येथील एक दिवशीय चर्चासत्र संपन्न…

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 6 1 7

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित धाराशिव येथील एक दिवशीय चर्चासत्र संपन्न…

धाराशिव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि रूपामाता अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी संयुक्त विद्यमाने १ जानेवारी २०२४ रोजी धाराशिव, संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट सोसायटींचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांचे एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.धाराशिव जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सतीश दंडनायक व दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ही उपस्थित पतसंस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.चर्चासत्राचे अध्यक्ष स्थान रूपामाता पतसंस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांनी भूषविले.

मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील पतसंस्थांनी बीड व संभाजीनगर जिल्ह्यात सहकारी पतसंस्थांविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ती जिल्ह्याच्या सीमेवर थोपवून धरली आहे. या बद्दल महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो. तसेच वेळोवेळी या भागातील सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट पतसंस्थांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान बाबतचे ज्ञान, आत्मविश्वास वाढवून संस्थेच्या प्रगतीमध्ये मोठा फायदा होणार आहे.

या प्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी आचार संहितेचे पालन करण्याची शपथ घेतली. विशेषत: ठेवी व कर्ज या बाबत स्वतःला बंधने घालून घेत स्वयं शिस्तीचा संकल्प केला. व्याज दर सर्वांचे एकसारखे ठेवण्याचा निर्णय ही सर्वानुमते घेण्यात आला. तसेच एकमेकांच्या पतसंस्थांमध्ये ठेवी न ठेवण्याचा निर्णय देखील एकमताने घेण्यात आला.

तसेच चुकीचे काम करणाऱ्या पतसंस्थांना साथ द्यायची नाही, परंतु आदर्शवत काम करणाऱ्या पतसंस्थांच्या मागे आर्थिक ताकद उभी करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी देखील जमा करण्यात आल्याची घोषणा दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली.

या वेळी धाराशिव, संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट सोसायटींचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक १५० च्या वर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन, उपस्थितांचे आभार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी मानले.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 6 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे