पतसंस्था चळवळीत संग्राम पतसंस्था वेगळे स्थान निर्माण करील – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
पतसंस्था चळवळीत संग्राम पतसंस्था वेगळे स्थान निर्माण करील – काका कोयटे, अध्यक्ष
संगमनेर : महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व संग्राम पतसंस्थेचे संस्थापक डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या प्रथितयश संस्थेच्या ठेवी १०८ कोटी ५० लाख, कर्ज ८३ कोटी ७६ लाख, गुंतवणूक ४६ कोटी ५४ लाख इतकी असून संगमनेरकरांना प्रामाणिक सेवा देत आहे. प्रामाणिक व तत्पर सेवा देऊन ग्राहक सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. भविष्यात संग्राम पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित करून महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत वेगळे स्थान निर्माण करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेचे मोबाईल बँकिंग ॲपचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
तसेच संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेची दिनदर्शिका प्रकाशन व संग्राम पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.सुधीर तांबे यांचा वाढदिवस आहे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा सत्कार संग्राम पतसंस्थेचे चेअरमन राणीप्रसाद मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे संस्थापक डॉ.सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक दत्तात्रय आरोटे यांनी केले. संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राणीप्रसाद मुंदडा, व्हा.चेअरमन इंजि.विजय गिरी, संचालक डॉ.नाजिमुद्दीन शेख, विलास दिघे, नानासाहेब वर्पे, दत्तात्रय आरोटे, श्रीकांत कोकणे, डॉ.सुचित गांधी, उमेश बोटकर, सोमेश्वर दिवटे, अनिल सातपुते, अमित कलंत्री, संचालिका सौ.सुनंदाताई दिघे, व्यवस्थापक उमेश शिंदे, एम.वाय.दिघे, अधिकारी कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार व्हा.चेअरमन इंजि.विजय गिरी यांनी मानले.