राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची शिवनेरी पतसंस्थेला सदिच्छा भेट…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची शिवनेरी पतसंस्थेला सदिच्छा भेट…
आष्टी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कडा सारख्या ग्रामीण भागात शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेने १३ कोटी रुपयांच्या ठेवी मिळविलेल्या असून शिवनेरी संस्था ही शून्यातून विश्व निर्माण करत आहे. शिवनेरी संस्थेच्या माध्यमातून कडासारख्या ग्रामीण भागात सर्वात सुंदर कार्यालय उभारून गावाच्या वैभवात भर घातली आहे हे पाहून अतिशय आनंद असून या संस्थेला सदिच्छा भेट देण्याचा योग आला.असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील शिवनेरी पतसंस्थेला २१ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सदिच्छा भेट दिली असता उपस्थित संचालक, अधिकारी, यांच्याशी संवाद साधत मार्गदर्शन ही केले. तसेच शिवनेरी पतसंस्थेतील तंत्रज्ञान व ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेत काळाबरोबर बदलत राहण्याचा मार्गदर्शनपर सल्लाही दिला.
या वेळी आष्टीचे सहाय्यक निबंधक बी.जे.शिंदे , चेअरमन नागेश कर्डिले, व्हा.चेअरमन प्रा.कैलास वायभासे, संचालक गोरख कर्डिले, भाऊसाहेब कर्डिले, संतोष भंडारी, एस. आर. पाटील, श्रीपाद धुमाळ, प्रा. युवराज चव्हाण, व्यवस्थापक प्रशांत गिलचे, वसुली अधिकारी अंबादास दौंड, सौरभ ढोबळे, कॅशियर राणी पोकळे उपस्थित होते.