Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

संभाजी भुजबळ पतसंस्थेचे यश हे ठेवीदारांच्या विश्वासाचे फलित – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 0 3 0

संभाजी भुजबळ पतसंस्थेचे यश हे ठेवीदारांच्या विश्वासाचे फलित – काका कोयटे, अध्यक्ष

शिरूर : तालुक्यातील तळेगाव ढमढेरेसारख्या केवळ २० ते २५ हजार लोकवस्तीच्या गावात ३० कोटी रुपयांहून अधिक ठेवी जमा करून संभाजी भुजबळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने पुणे जिल्ह्यात विक्रम निर्माण केला आहे. ठेवीदारांच्या विश्वासाला कुठलाही तडा न जाऊ देता, केवळ एका शाखेच्या आधारावर एवढे मोठे कार्य उभे राहणे हे संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीला भूषणावह असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे संभाजी भुजबळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्व. संभाजी अण्णा भुजबळ यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सहकार प्रशिक्षण वर्ग, संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच स्व. संभाजी अण्णा भुजबळ यांच्या अर्ध पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था या केवळ आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था नसून त्या समाजविश्वासावर उभ्या असलेल्या लोककल्याणकारी चळवळी आहेत. पारदर्शक कारभार, शिस्तबद्ध प्रशासन, नियोजनबद्ध कर्जवाटप आणि ठेवीदारांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळेच सहकार टिकतो व वाढतो. संभाजी भुजबळ पतसंस्थेने या मूल्यांची जपणूक करत आदर्श निर्माण केला आहे.

संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या शुभ हस्ते पार पडले, तर स्व. संभाजी अण्णा भुजबळ यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतवाहक डॉ. प्रवीण दबडगाव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक विनायक तांबे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, अरुण साकोरे, शिरूर तालुका सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, विशेष लेखापरीक्षक विजय पाखले, सनदी लेखापाल पंकज सुराणा, सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर मुसळे, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, सभासद, पंचक्रोशीतील हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे संचालक अरुण भुजबळ यांनी केले. व्हा.चेअरमन दादासाहेब भुजबळ यांनी प्रास्ताविकातून संस्थेविषयी माहिती दिली. प्रसंगी संस्थेचे संचालक राजेंद्र गोरे, सुरेश रासकर, रमेश भुजबळ, अशोक भुजबळ, अरुण भुजबळ, प्रमोद ढवळे, संचालिका मंदा ढमढेरे, रंजना नरके, सुनंदा सातपुते, तज्ञ संचालक ॲड.गणेश नरके उपस्थित होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव दीक्षित आणि अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार चेअरमन राजाराम शिंदे यांनी मानले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे