Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक पावले उचलणार – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार सकारात्मक पावले उचलणार – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत कोल्हापूर येथील राज्यसभेचे खासदार मान.धनंजयराव महाडिक व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मान.पंकजजी चौधरी यांची भेट घेतली.

प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.शांतीलाल शिंगी, महासचिव शशिकांत राजोबा संचालक जवाहर छाबडा तसेच कोल्हापूर येथील सी.ए. दत्तात्रय खेमनर, कोल्हापुर येथील सुप्रसिद्ध सी.ए.शिवराज मगर यांचा समावेश होता.

या वेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ व कामकाज आणि व्यापकता याबद्दल मंत्रिमहोदयांना सविस्तर माहिती दिली पतसंस्थांना कर प्रणाली मध्ये आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील करण्यात आली.

➡️ सहकारी पतसंस्थांना आयकर कलम कायदा कलम 80 पी प्रमाणे आयकरात पूर्णपणे सुट द्यावी.
➡️ सहकारी पतसंस्थांच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजामध्ये टीडीएस कापू नये.
➡️ सहकारी पतसंस्थांना पेमेंट गेटवे मध्ये सहभागी करून घ्यावे.
➡️ कलम 269 S व 269 ST या मधून सहकारी पतसंस्थांना सूट देण्यात यावी.
➡️ सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना बँकांप्रमाणे विमा संरक्षण मिळावे.

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या या मागण्यांचे निवेदन राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाने दिले.

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली आहे ग्रामीण भागातील नागरिकांना या चळवळीने बचतीची सवय लावलेली आहे. त्यामुळे या पतसंस्थांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार सकारात्मक दृष्टीने पावले उचलेल.

मान.मंत्री महोदय यांनी सहकार खात्याचे केंद्रीय मंत्री मान.अमितजी शहा व केंद्रीय सहकार राज्यमंत्री मान.मुरलीधरजी मोहोळ यांच्या समवेत एकत्रित बैठक आयोजित करून या सर्व प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन मान. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या प्रसंगी दिले.

2/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे