Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचे श्रीगोंदा तालुक्यातील पतसंस्था प्रतिनिधींना मार्गदर्शन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 6 1 7

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचे श्रीगोंदा तालुक्यातील पतसंस्था प्रतिनिधींना मार्गदर्शन

श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ आणि श्रीगोंदा तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आढावा बैठक व विचार मंथन मेळावा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीगोंदा तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानदेव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली आणि अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील महेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे मार्गदर्शन करताना म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. तरी देखील इतर तालुक्यातील चुकीचे काम करणाऱ्या सहकारी पतसंस्थाबाबतच्या वातावरणाचा आपल्या तालुक्यात शिरकाव होऊ नये. यासाठी तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. विशेषतः वसुली वेळेवर होण्यासाठी एखादे खाते थकबाकीत गेल्यास त्यावर तातडीने कारवाई करून कायदा कलम १०१ चा दाखला मिळवून त्यावर कायदा कलम १५६ प्रमाणे विशेष वसुली अधिकाऱ्याद्वारा कारवाई सुरू केली पाहिजे.

तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची क्रास प्रणाली वापरल्याशिवाय तालुक्यातील कोणत्याही पतसंस्थेने कर्ज वितरण करू नये असे आवाहन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले. महाराष्ट्र शासन सहकार खात्याने लादलेल्या अंशदानाच्या विषयावर देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी अंशदान न भरण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या बैठकीला उपस्थित विविध पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी तालुक्यातील सहकारी पतसंस्था विषयीच्या अडी – अडचणी विशद करताना म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्याचे सहाय्यक निबंध यांनी गेल्या २-३ वर्षात एक ही मासिक, वार्षिक आढावा बैठक घेतली नसून तालुक्यातील कोणत्याही पतसंस्थेला कायदा कलम १०१ दाखला दिलेला नाही. या वर श्रीगोंदा तालुक्यातील या अडी – अडचणी सहकार आयुक्तांच्या कानावर घालण्याचे आश्वासन काका कोयटे यांनी दिले.

या वेळी श्रीगोंदा तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष सुरेशशेठ भंडारी, महेश्वर मल्टीस्टेट अध्यक्ष दत्तात्रय गावडे, विठाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन विठूशेठ शिंदे, इंदिरा गांधी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन एकनाथ आळेकर, श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव कोल्हटकर, वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे, खोलेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील दरेकर, महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव हिरवे, श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन दिलीपकुमार लुनिया, बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तम डाके आदींसह तालुक्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 6 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे