सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था सक्षमपणे आर्थिक कामकाज करणारी महिलांची पतसंस्था – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था सक्षमपणे आर्थिक कामकाज करणारी महिलांची पतसंस्था – काका कोयटे, अध्यक्ष
पुणे : पतसंस्था चळवळीत पुरुषांबरोबरच महिलाही सहकारी पतसंस्थांचे आर्थिक कामकाज उत्कृष्ट व सक्षमपणे करत आहेत. त्यातीलच पुणे जिल्ह्यातील सौ.सुचित्रा दिवान यांच्या अध्यक्षतेखाली सहकार खात्याच्या निकषाप्रमाणे सक्षमपणे आर्थिक कामकाज करणारी सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम असून भक्कम स्थितीत आहे. त्या संस्थेचा वैधानिक तरलता निधी ४२.९२ टक्के इतका आहे. सीडी रेशो ६४.७१ टक्के असून स्वनिधी १६ टक्के आहे. या संस्थेच्या सर्व संचालिका महिला असून सहकारी पतसंस्था चळवळीत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.
पुणे जिल्ह्यातील सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे सदिच्छा भेट दिली असता, सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अधिकारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षा सुचित्रा दिवान यांच्या हस्ते राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांचा सत्कार उपाध्यक्षा वृषाली सुलाखे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी संस्थेच्या संचालिका लता खेर, रंजना दाभाडे, शीतल बुट्टे पाटील, वरीष्ठ व्यवस्थापिका ज्योत्स्ना काशिद व अधिकारी उपस्थित होते.