Breaking
ब्रेकिंग

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे विचार मंथन शिबीर व पतसंस्था प्रतिनिधींचा मेळावा संपन्न

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 8 9 7 9

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे विचार मंथन शिबीर व पतसंस्था प्रतिनिधींचा मेळावा संपन्न

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थांनी पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता या विषयावर हॉटेल बग्गा इंटरनॅशनलच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे विचार मंथन शिबीर व पतसंस्था प्रतिनिधींचा मेळावा संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सहकार भारती आयोजित या विचार मंथन शिबिर व जिल्ह्यातील पतसंस्था प्रतिनिधींच्या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते उपस्थित होते तर जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी सर्व पतसंस्थांनी वैधानिक तरलता, रोख तरलता तसेच सर्व निकषांचे तंतोतंत पालन करावे. सहकार खाते आपल्या सर्व पतसंस्थांना सावरण्यासाठी निश्चित मार्गदर्शन करणार असल्याचे आश्वासन दिले. तर जिल्ह्याचे विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांनी ‘पतसंस्था चळवळ सक्षमीकरणासाठी उपाय व योजना’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी लेखा परीक्षणाचे सर्व निकष काटेकोर व तंतोतंत पाळल्यास जिल्ह्यातील एक ही सहकारी पतसंस्था अडचणीत येणार नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

मेळाव्याचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.शांतीलाल शिंगी यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळी विषयी सविस्तर माहिती देत जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचा आढावा सादर केला. तसेच आपल्या शेजारच्या धाराशिव, बीड व इतर भागातील सहकार चळवळ अडचणीत येत असताना आपण सर्वांनी अतिशय दक्ष राहिले पाहिजे. सहकार खात्याने घालून दिलेले सर्व निकष पाळले पाहिजेत. मलकापूर अर्बन को – ऑप. बँकेत अडकलेल्या सहकारी पतसंस्थांच्या गुंतवणुकीमुळे आपल्या अडचणींचे प्रमाण वाढलेले आहे. आणखी ही सहकारी पतसंस्थांविषयी असणाऱ्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी संघटित होऊन पतसंस्था चळवळीची एकजूट अशीच ठेवली पाहिजे.

अध्यक्षीय मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थांवर आलेल्या आपत्तीला इष्टापत्ती समजून आपण काम करूया.. विशेषत: थकबाकी वसुलीसाठी सर्वांनी नेटाने काम करावे. कठोर परंतु कायदेशीर वसुली करावी. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तत्पर राहील.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आबासाहेब देशमुख यांनी केले. या वेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे दादाराव तुपकर सहकार भारती प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील मोतलग, शहराध्यक्ष रामसिंग बहुरे, श्रीरंग पाटील, सुधाकर जाधव आदींसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संभाजी राचुरे यांनी मानले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे