Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

“धुळे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या अडचणींवर उपायासाठी राज्य फेडरेशन प्रयत्नशील राहील : काका कोयटे, अध्यक्ष”

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

“धुळे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या अडचणींवर उपायासाठी राज्य फेडरेशन प्रयत्नशील राहील : काका कोयटे, अध्यक्ष”

धुळे : धुळे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या सशक्तीकरणासाठी आणि कार्य क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ३० जुलै २०२५ रोजी धुळे येथे “पतसंस्थांशी प्रत्यक्ष संवाद” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे स्वीकृत सदस्य गोपालराव केले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यातील अनेक सहकारी पतसंस्थांमध्ये कार्य क्षमतेचा अभाव, वित्तीय अडचणी, लेखापरीक्षणातील विलंब, संगणकीकरणाची गरज आणि नियामक प्रक्रियांमधील गुंतागुंत ही प्रमुख आव्हाने आहेत. या अडचणी धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा यांनी आपल्या मनोगतातून राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी सांगितले की, “धुळे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या सशक्तीकरणासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न व्हावेत, यासाठी राज्य फेडरेशनने पुढाकार घ्यावा.”

मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “राज्य फेडरेशन केवळ नियामक संस्था नसून, पतसंस्थांच्या अडचणी समजून घेत त्यांना दिशा देण्याचे काम देखील करते. धुळे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी राज्य फेडरेशन पूर्णपणे प्रयत्नशील राहील.” त्यांनी सहकार चळवळीच्या नव्या पर्वासाठी सुधारित धोरणे, प्रशिक्षण, तांत्रिक सक्षमता आणि वित्तीय मदतीचे पर्याय सुचवले.

कार्यक्रमाचे आयोजन धुळे शहरातील योगेश्वर सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, संचालक आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी थेट संवादाद्वारे उपस्थितांनी आपल्या समस्या, अडचणी आणि सुचवलेल्या उपाय योजना सादर केल्या.

हा संवाद धुळे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना नवचैतन्य देणारा ठरला असून राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सक्रिय सहभागामुळे सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थित सहकारी पतसंस्था प्रतिनिधींनी मनोगतातून व्यक्त केला.

या वेळी धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष रवींद्र वाणी, मानद सचिव भाऊसाहेब देवरे, संचालक देविदास पाटील, जगदीश सूर्यवंशी, सुरेश जैन, कैलासचंद गोगड, भास्कर पाटील, शरद पाचपुते, संचालिका सौ.योगिता शहा, सौ. उषा साळुंखे, सौ.वृषाली चिंचोले, स्वीकृत संचालक डॉ.संजय पाटील, कार्यकारी संचालक उदय शिनकर, योगेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन केले आदींसह जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे