Breaking
ब्रेकिंग

सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुली बाबत जिल्हा पोलीस प्रमुख राकेशजी ओला यांना निवेदन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 6 1 7

सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुली बाबत जिल्हा पोलीस प्रमुख राकेशजी ओला यांना निवेदन

कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्थांची जंगम जप्ती, स्थावर जप्ती या सारख्या थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण मिळत नाही. त्या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी पोलीस बंदोबस्त मिळावे.अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघ अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक शिवाजी आप्पा कपाळे आदींनी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशजी ओला यांना निवेदन देत केली.

Police_Protection_Gr

२९ जानेवारी २०१९ च्या शासन परिपत्रक क्र.याचिका – ०११९/०१/ प्र. क्र. वि शा – अ नुसार जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींसोबत थकबाकी वसुलीत येणाऱ्या अडी अडचणी बाबत दर तीन महिन्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने बैठक घेण्यात यावी. वसुलीच्या मोठ्या कर्ज प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा करण्यात यावा. ज्या कर्ज प्रकरणांमध्ये पतसंस्थांना पोलीस संरक्षण आवश्यक असल्यास ते देण्यात यावे.असे सांगितले आहे.

Police_Protection_Gr

तसेच जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण लागत असेल किंवा वसुलीबाबत इतर काही अडचणी असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघ यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना केले.

अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुलीला संरक्षण मिळावे या विषयी लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील ज्या ज्या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण पाहिजे असेल त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येईल असे आश्वासन या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशजी ओला यांनी दिले.

2/5 - (5 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 6 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे