Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पतसंस्थांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून प्रगती करावी – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 3 2 2

पतसंस्थांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून प्रगती करावी – काका कोयटे, अध्यक्ष

जालना : सहकारी पतसंस्थांना प्रगती करण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहे. ठेवी स्वीकारून व कर्ज वितरण करून आर्थिक प्रगती होत आहे. या व्यतिरिक्त धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिल्यास राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या आर्थिक प्रगतीत भर पडणार असून प्रामुख्याने सामाजिक कामकाजाच्या माध्यमातून प्रगती करता येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि जालना जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व १७ जून २०२४ रोजी हॉटेल सॅफरॉन येथे दोन दिवसीय मराठवाडा विभागीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ठेवीदारांच्या पैशाचे मालक समजून स्वतःचे व्यवसाय वाढविण्या ऐवजी संस्थेची संपत्ती वाढवावी. जालना फेडरेशन आयोजित या प्रशिक्षणासारखी इतर पतसंस्था फेडरेशनने प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये जागृती करत मनोबल वाढवून सहकारी पतसंस्था चळवळ सुदृढ बनविण्याचे आवाहन केले.

उपस्थितांशी संवाद साधताना बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्यामजी चांडक म्हणाले की, ईश्वराला कोणी पाहिले नाही तो दिसत नसला तरी सृष्टी चालवतो अशी सर्वत्र समज आहे. सहकारात काम करताना आपण देत असलेल्या कर्जामुळे गरजवंतांना वेळेवर मदत होते. गतजन्मीच्या पुण्याईमुळेच आपण या क्षेत्रात काम करत आहोत असे लक्षात घ्यावे, सहकारात काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला ईश्वराचा अंश मानून समाजाचे काम करा.

तसेच क्रोधाचा अंत वाईट असून राग सोडा. शब्द आणि वेळ पाळा. मान – अपमान पचवायला शिका. यशाचे श्रेय कर्मचाऱ्यांना तर अपयशाचे श्रेय स्वतःला घ्या असा मौलिक सल्ला राधेश्यामजी चांडक यांनी दिला. राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.शांतीलाल सिंगी यांनी मनोगतातून मागासपणाचा दृष्टिकोन बदलावा असे सांगितले.

दोन दिवसीय प्रशिक्षणात सहकार व बँकिंग तज्ञ डॉ.अभय मंडलिक यांनी ‘पतसंस्थांची व्यवसाय वृद्धी आणि फायदेशीर व कायदेशीर गुंतवणूक’ तर राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी ‘आधुनिक तंत्रज्ञानाद्वारा पतसंस्थांचे कामकाज व व्यवसाय वृद्धी’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्रशांत खोपडीकर यांनी ‘पतसंस्था व कर्ज व्यवस्थापन’ या विषयाच्या अनुषंगाने कलम १०१, १३८ व १५६ यांची महत्त्वपूर्ण माहिती दिली. अंबेश बियाणी यांनी ही ऑडिट बाबत मार्गदर्शन केले.

जालना पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून मराठवाडा – विदर्भासाठी जालना येथे प्रशिक्षणासाठी इमारत, बँकांप्रमाणे पतसंस्थांना ऑनलाईन सुविधा, तसेच स्थैर्य निधी संघ उभारण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसन्ना जाफ्राबादकर यांनी केले. या वेळी बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्यामजी चांडक, राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, सुदर्शन भालेराव, जालना फेडरेशनचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ.विठ्ठल पवार, संचालक तथा प्रकल्प प्रमुख संजय राठी, प्रसन्ना जाफ्राबादकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर संतोष जाधव, सतीश निर्वळ, रवींद्र अबोटी, ॲड. दशरथ इंगळे, ज्ञानेश्वर काळे, डॉ. जगन्नाथ खंडागळे आदींसह जिल्ह्यातील ५३ पतसंस्थांचे संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार भगवान जायभाये यांनी आभार मानले.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 3 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे