Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

“सहकारातून घडलेले पंडितराव देशमुख यांचे नेतृत्व शहराच्या विकासाला नवी दिशा देईल” – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 1 9 6

“सहकारातून घडलेले पंडितराव देशमुख यांचे नेतृत्व शहराच्या विकासाला नवी दिशा देईल” – काका कोयटे, अध्यक्ष

चिखली : चिखली ही केवळ नगर परिषद नसून ती सहकाराची समृद्ध परंपरा जपणारी सहकार नगरी आहे. अशा सहकार नगरीतून सहकारी पतसंस्था चळवळीतून घडलेले नेतृत्व लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून येणे ही संपूर्ण सहकारी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव रामराव देशमुख यांनी सहकार क्षेत्रात पारदर्शकता, शिस्त व लोकाभिमुख कार्यपद्धती जपत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे. हाच अनुभव नगरपालिकेच्या कारभारात निश्चितच उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

नुकत्याच पार पडलेल्या चिखली नगर परिषदेच्या निवडणुकीत राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील चिखली येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव रामराव देशमुख यांची लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. सहकारी क्षेत्रासाठी ही भूषणावह बाब असल्याने त्यांच्या हृदय सत्कार राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सहकारी संस्था ही लोकशाहीची खरी शाळा आहे. सहकारातून घडलेले नेतृत्व सामाजिक बांधिलकी जपत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे कार्य करू शकते. चिखली शहराचा विकास, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख निश्चितच कार्य करतील, असा विश्वासही काका कोयटे यांनी व्यक्त केला. तसेच चिखली हे गाव आदर्श सहकार गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित करावे यासाठी पंडितराव देशमुख यांनी त्यांचे कार्य काळात प्रयत्न करावे व सर्व सहकारी पतसंस्थांनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन देखील या वेळी काका कोयटे यांनी केले.

हा हृदय सत्कार समारंभ २४ जानेवारी २०२६ रोजी चिखली येथील बालाजी अर्बन पतसंस्थेच्या वीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. या वेळी बुलढाणा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.शांतीलाल शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, तज्ज्ञ संचालक सुदर्शन भालेराव, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, जवाहर अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश बाहेती, अंबिका अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोठारी, बालाजी अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेश व्यवहारे, इंदिरा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्रप्रसाद हरलालका यांच्यासह चिखली सहकार नगरीतील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे