Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

शिर्डीच्या सहकार परिषदेत पतसंस्था चळवळ सक्षमपणे चालविण्याची शपथ घेणार – काका कोयटे‌, अध्यक्ष ; नारायणगावात सहकार दिंडीचे बँड पथक व ढोल -ताशांच्या गजरात अभूतपूर्व स्वागत

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 7 9 8 8

शिर्डीच्या सहकार परिषदेत पतसंस्था चळवळ सक्षमपणे चालविण्याची शपथ घेणार – काका कोयटे‌, अध्यक्ष ; नारायणगावात सहकार दिंडीचे बँड पथक व ढोल -ताशांच्या गजरात अभूतपूर्व स्वागत

नारायणगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या माध्यमातून पतसंस्थांची ताकद काय आहे हे शासनाला दाखवून दिले जाईल. पतसंस्था प्रामाणिकपणे व सक्षमपणे चालविण्याची शपथ पतसंस्था चळवळीतील सर्व कार्यकर्ते या परिषदेत घेणार आहेत, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार परिषदेनिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे सोमवारी (३ फेब्रुवारी) रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (जि. पुणे) येथे आगमन झाले. फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत बँड पथक व ढोल-ताशांच्या गजरात या सहकार दिंडीचे व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचे भव्य दिव्य असे जोरदार स्वागत करण्यात आले.

नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून या सहकार दिंडीतील रथाची शहरातील प्रमुख रस्त्यावरून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी विविध पतसंस्थांतर्फे आकर्षक कमानी उभारून रांगोळ्या काढून व फटाक्यांची आतषबाजी करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. काका कोयटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर ही मिरवणूक जयहिंद मंगल कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे आयोजित कार्यक्रमात काका कोयटे यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक, युवा नेते अमित बेनके म्हणाले, महाराष्ट्रातील सहकार चळवळीत पतसंस्थांचे खूप मोठे योगदान आहे. जुन्नर तालुक्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली आहे. तालुक्यात १९२ सहकारी पतसंस्था असून, या संस्थांकडे २२५० कोटींच्या ठेवी आहेत. या पतसंस्थांनी १७५० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. राज्यातील पतसंस्था चळवळीला काका कोयटे यांच्यासारखे कार्यक्षम नेतृत्व लाभले असून, त्यांनी पतसंस्था बलवान करण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.

काका कोयटे म्हणाले, महाराष्ट्र हा सहकाराचा बालेकिल्ला समजला जातो. महाराष्ट्राने सहकारी संस्था सक्षमपणे कशा चालवाव्यात याचा आदर्श संपूर्ण देशाला घालून दिला आहे. “युनो” ने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे सर्वात प्रथम स्वागत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने करून हे वर्ष विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांनी साजरे करण्याचे नियोजन केले. सहकारी पतसंस्था चळवळीची प्रतिष्ठा व लोकांचा पतसंस्थांवरील विश्वास वाढावा, सहकार चळवळीत युवकांचा व महिलांनी मोठ्या प्रमाणात कार्यरत व्हावे या उद्देशाने राज्य पतसंस्था फेडरेशनने यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित केलेल्या दोन सहकार दिंड्यांचे‌ राज्यात ठिकठिकाणी प्रचंड उत्साहात स्वागत झाले. या दिंडीमुळे पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर होऊन नवचैतन्य निर्माण झाले आहे. पतसंस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्हाला सहकार खात्याशी संघर्ष करावा लागतो. सहकार खात्याकडे आम्ही आईच्या भूमिकेतून पाहतो. बाळ रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही म्हणून आम्ही आक्रोश करतो.

पतसंस्थांकडून अंशदान घेण्यास आमचा विरोध नाही, पण अंशदान घेत असताना त्याचा विनियोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे तसेच राज्य व जिल्हा पतसंस्था फेडरेशनला विश्वासात घेऊनच अंशदानाचा निर्णय सहकार विभागाने घेतला पाहिजे. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळाले पाहिजे, या व इतर मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. या परिषदेत महाराष्ट्रासह इतर सहा राज्यातील व बाहेरच्या आठ देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार असून सहकार कायदे व पतसंस्थांच्या कार्यपद्धतीबद्दल चर्चासत्राच्या माध्यमातून मंथन केले जाणार आहे. ही ऐतिहासिक परिषद पतसंस्था चळवळीच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरेल व सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवी दिशा या परिषदेच्या माध्यमातून मिळेल. पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुत्रसंचालन राज्य पतसंस्था फेडरेशनचे सहसचिव भास्कर बांगर तर प्रास्ताविक व नियोजन सहकार क्षेत्रातील आर्थिक सल्लागार लक्ष्मण मंडलिक यांनी केले. तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर यांनी आभार मानले. नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, उपसरपंच बाबूशेठ पाटे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे, संचालिका प्रियंका शेळके, सचिव शरद धोंगडे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत वाजगे आदींनी काका कोयटे यांचे स्वागत केले.

या वेळी अंबिका पतसंस्थेचे अध्यक्ष शैलेश गायकवाड, उपाध्यक्ष संतोष पटाडे, अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मेहत्रे, धर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण डेरे, विशाल जुन्नर पतसंस्था, मुंबईचे अध्यक्ष अरुण पारखे, ग्रामसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत शेळके, गिरीजात्मक पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी एकनाथ माळवे, संतोष भुजबळ, निलेश धोंगडे यांच्यासह पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 7 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा