Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘अष्टावधानी बँकिंग’ हे गणेश निमकर यांचे तिसरे पुस्तक रत्न – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 2 4 4

‘अष्टावधानी बँकिंग’ हे गणेश निमकर यांचे तिसरे पुस्तक रत्न – काका कोयटे, अध्यक्ष

पुणे : बँकिंग व सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे गणेश निमकर. त्यांचे अष्टावधानी बँकिंग हे पुस्तक सहकारी बँका व सहकारी पतसंस्थांसाठी गीता, कुराण, बायबल या धर्मग्रंथाप्रमाणे असून सहकाराचा धर्मग्रंथ आहे. हा ग्रंथ प्रत्येक सहकारी संस्थांनी आपल्या सहकार मंदिरात ठेवला पाहिजे. त्यांची पुस्तके ही राज्यातील पतसंस्था चळवळीला मार्गदर्शक असून पतसंस्थांसाठी पुस्तकांचा खजिना आहे. ‘अष्टावधानी बँकिंग’ हे त्यांच्या खजिन्यातील तिसरे पुस्तक रत्न असून सहकारातील बँकिंग व पतसंस्था क्षेत्राला मार्गदर्शक ठरेल. असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

पुणे जिल्ह्यातील एरंडवणा येथील सेवा भवन मध्ये महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिलजी कवडे, सहकार आयुक्त दिपकजी तावरे, अप्पर निबंधक शैलेशजी कोतमिरे, श्रीकृष्णजी वाडेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रशासक विद्याधरजी अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीषजी देशपांडे यांच्या शुभ हस्ते ५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सहकारी पतसंस्था, बँका सहकारातील कायदा, कलमे, विविध परिपत्रकांच्या आधारे सभासद, ग्राहकांना सेवा देत असतात. तसेच पतसंस्थांच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे कायदे, कलम व विविध परिपत्रकांची सुस्पष्टपणे माहिती सहकार, बँकिंग तज्ञांच्या विविध पुस्तकांच्या माध्यमातून होत असते.

प्रसंगी ज्ञानदीप नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन जिजाबा पवार, शिवकृपा पतसंस्था चेअरमन गोरख चव्हाण, भाई वाहिंगळे, कमळ नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन गिरीश तुळपुळे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, लोकमान्य मल्टीस्टेट मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील जाधव आदिंसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी, सहकार खात्याचे विद्यमान व माजी अधिकारी तसेच बँका व पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, संचालिका, अधिकारी व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, मित्र, नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.

5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 2 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे