राज्य फेडरेशनचा अविस्मरणीय सोहळा – दिपक तावरे, सहकार आयुक्त
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

राज्य फेडरेशनचा अविस्मरणीय सोहळा – दिपक तावरे, सहकार आयुक्त
शिर्डी : सहकारी पतसंस्था चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय आणि ‘न भूतो, न भविष्यती:’ असा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या सोहळा होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली या सहकार परिषदेची तयारी सुरू आहे . सहकारी पतसंस्था चळवळीतील सर्व कार्यकर्ते, सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केले.
शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेसाठी भव्य दिव्य मंडप उभारणी शुभारंभ सहकार आयुक्त दिपक तावरे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार आयुक्त दिपक तावरे यांचा सत्कार फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को – ऑप. सोसायटी अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, संचालक वासुदेव काळे, भास्कर बांगर, संचालिका ॲड सौ.अंजली पाटील, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड, सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.