राज्याचे उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री व आमदार काशिनाथ दाते यांना आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे निमंत्रण
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

राज्याचे उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री व आमदार काशिनाथ दाते यांना आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे निमंत्रण
शिर्डी : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ जगातील सर्वात मोठी चळवळ आहे. ती पाहण्यासाठी परदेशातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी येत असल्याचे समाधान व्यक्त करत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनसाठी अभिनंदनीय बाब असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील पारनेर तालुक्याचे जायंट किलर आमदार काशिनाथ दाते यांना शिर्डी येथे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री , पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते यांनी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे निमंत्रण राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, महासचिव शशिकांत राजोबा, खजिनदार दादाराव तुपकर, सुदर्शन भालेराव यांनी दिले.
प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना निमंत्रण दिले असता त्यांनी ते स्वीकारत या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये सहकार खात्याचा देखील उस्फूर्त सहभाग असल्यामुळे परिषदेला नक्की येण्याचे कबूल केले.
या वेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, महासचिव शशिकांत राजोबा, खजिनदार दादाराव तुपकर, सुदर्शन भालेराव आदींसह पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.