वॉशिंग्टन येथे जागतिक महिला परिषदेत सहकार उद्यमी अध्यक्षा अंजलीताई पाटील यांना मार्गदर्शन करण्याची संधी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
वॉशिंग्टन येथे जागतिक महिला परिषदेत सहकार उद्यमी अध्यक्षा अंजलीताई पाटील यांना मार्गदर्शन करण्याची संधी
बाली (इंडोनेशिया) : असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यु) या सहकारी पतसंस्थांची आंतरराष्ट्रीय शिखर संस्था असलेल्या संस्थेच्या वतीने इंडोनेशिया देशातील बाली येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत ‘भारतातील व जगभरातील सहकारी पतसंस्था चळवळीत महिलांचे स्थान’ या विषयावर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी अध्यक्षा डॉ.अंजलीताई पाटील यांनी विविध देशातील उपस्थित सहकारी पतसंस्था चळवळीतील महिलांना मार्गदर्शन केले.
जागतिक महिला परिषदेचे अध्यक्षा Eleni Giakoumopoulos यांच्या समवेत अंजलीताई पाटील चर्चा करताना.
प्रसंगी जागतिक महिला सहकार परिषदेच्या अध्यक्षा इलेनी जियाकौमोपोलस डॉ.अंजलीताई पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाने प्रभावित होऊन वॉशिंग्टन येथे होणाऱ्या जागतिक महिला परिषदेत तेथील सहकारी पतसंस्था चळवळीतील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. ही भारत देशासाठी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनसाठी अभिमानास्पद बाब आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनला अभिमान वाटावे असे कार्य अंजलीताई पाटील यांच्या हातून घडत असून जागतिक महिला परिषदेत देशाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळत असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष व ॲक्युचे संचालक व खजिनदार ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.