सहकार दिंडीचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत पतसंस्थांच्या अडचणी शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील – आमदार अमल महाडिक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सहकार दिंडीचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत पतसंस्थांच्या अडचणी शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील – आमदार अमल महाडिक
कोल्हापूर : सन २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे, त्यानिमित्त महाराष्ट्र शासन सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यभर सहकार दिंडीचे आयोजन केले आहे. मुंबई पासून शिर्डी पर्यंत काढण्यात आलेल्या स्वर्गीय धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे आगमन झाले. त्यावेळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की ,देशाच्या विकासात महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे भरीव योगदान असून पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत रुजली असल्याचे सांगितले ‘सहकारातून समृद्धी’ हे ब्रीद जोपासत सहकारी पतसंस्थांनी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करून आर्थिक विषमतेची दरी दूर करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, पतसंस्थांच्या अडचणी शासन दरबारी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन करून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त निघालेल्या सहकार दिंडीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांनी शासनाने पतसंस्थानाही ईतर संस्था प्रमाणे आर्थिक मदत दिली पाहिजे व राज्य पतसंस्था फेडरेशन व जिल्हा पतसंस्था फेडरेशनला विश्वासात घेऊनच सरकारने अंशदान भरण्याबाबतचा निर्णय घ्यावा असे सांगून पतसंस्था चळवळीची प्रतिष्ठा वाढावी तसेच पतसंस्थांवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास वाढावा सहकारात महिलांचा व तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केलेचे सांगितले .पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल पाटील व बुलढाणा अर्बन चे मुख्य अधिकारी यांनी पतसंस्थांच्या अडचणी शासनाने सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोल्हापूर शहर च्या उपनिबंधक प्रिया दळणर यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त आलेल्या सहकार दिंडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील म्हणाले की शिर्डी येथील अधिवेशनामध्ये केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शहा ,राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,सहकार मंत्री तसेच सहकारातील बर्याच तज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार असून त्यामध्ये आपल्या पतसंस्थांच्या प्रश्नांवर विचारविनिमय होणार आहे त्यासाठी आपल्या सहकार कायद्यात कराव्या लागणाऱ्या दुरूस्ती तसेच पतसंस्थाच्या वसुली व इतर काही असणाऱ्या अडचणी जिल्हा अथवा राज्य फेडरेशन कडे पाठवाव्यात तसेच दिनांक 9 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे होणाऱ्या सहकार परिषदेस जास्तीत जास्त प्रतिनिधीने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय सहकार परिषद यशस्वी करण्याचे आव्हान केले
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आलेल्या दिंडीचे स्वागत सनई चौघडा, तुतारी आणि हलगीच्या वाद्याने तसेच फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला स्वागत सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष अरविंद मजलेकर यांनी केले प्रास्ताविक राज्य फेडरेशनचे संचालक सागर चौगुले यांनी केले सूत्रसंचालन व्यवस्थापक दीपक पाटील यांनी केले कार्यक्रमास राज्य फेडरेशनचे वंजारी, सहाय्यक निबंधक प्रेमचंद राठोड, संजय परभणे, चंद्रकांत इंगवले, सहकार विभाग व लेखापरीक्षण विभागातील सर्व अधिकारी फेडरेशनचे सर्व संचालक यांच्यासह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी फेडरेशनचे सर्व सेवक वसुली अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार फेडरेशनचे संचालक प्राध्यापक सुनील भोसले यांनी मानले